Buldhana Accident : चालू बसचं स्टेअरिंग लॉक झालं अन् एसटी पलटी, बसमध्ये 25 प्रवासी
Buldhana Accident : चालू बसचं स्टेअरिंग लॉक झालं अन् एसटी पलटी, बसमध्ये 25 प्रवासी
लेवाजगत न्युज बुलढाणा:-चिखली बुलढाण्यातील अपघातांची (Buldhana Accident) मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. बुलढाणा जिल्ह्यात आज एक बस अपघात घडला आहे. एसटी बसचं (ST Bus Accident) स्टेअरिंग लॉक झाल्यानं हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पटली झाल्याची धक्कादायक घटान चिखली येथे घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळी सात वाजताच्या सुमारात एसटीचा अपघात झाल्याची माहिती आहे. बसमध्ये सुमारे 25 प्रवासी होते.
स्टेअरिंग लॉक होऊन चालू बस पलटली
प्रवाशांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याने काही जण जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. बुलढाणा - सवणा ते चिखली एसटी बसला अपघात झाला. स्टिअरिंग रॉड लोक झाल्याने गाडी पलटी झाली. यामुळे चालकासह दहा ते पंधरा विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही एसटी बस सवणावरून चिखलीच्या दिशेने जात होते, त्यावेळी हा अपघात घडला. बसमध्ये विद्यार्थ्यांसह सुमारे 25 प्रवाशी प्रवास करत होते. सकाळी सात वाजेदरम्यान ही घटना घडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत