Header Ads

Header ADS

मूर्तिजापूर स्टेशनवर ब्लॉक, १४ एक्स्प्रेसला रेड सिग्नल ३० व ३१ ऑगस्टला धावणाऱ्या गाड्यांचा खोळंबा

 

Block at Murtijapur-station,-14-express-red-signal-blocking-of-trains-running-on-30th-and-31st-of-August

मूर्तिजापूर स्टेशनवर ब्लॉक, १४ एक्स्प्रेसला रेड सिग्नल


३० व ३१ ऑगस्टला धावणाऱ्या गाड्यांचा खोळंबा


लेवाजगत न्यूज भुसावळ-भुसावळ रेल्वे विभागातील मूर्तीजापूर स्टेशन व यार्डात लांब पल्ल्याच्या लूप दुरुस्तीसाठी ३० ऑगस्टच्या सायंकाळी ६ ते ३१ ऑगस्टच्या दुपारी २ वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक घेतला आहे. या कामासाठी विभागातून धावणाऱ्या १४ गाड्या रद्द केल्या आहेत.

     भुसावळ आणि विभागातील लांब पल्ल्याच्या मालगाड्या विभागादरम्यान नियमितपणे धावतात. त्यामुळे मूर्तिजापूर स्थानकावर जवळपास मालगाड्या सामावून घेण्याएवढी लांब लूप लाईन तयार करण्याची योजना आहे. जेणेकरून लांब पल्ल्याच्या मालगाड्या चालवताना मेल एक्सप्रेस गाड्यांना सुद्धा प्राधान्य देऊन वेळेवर चालवता येईल. या कामासाठी २९ ऑगस्टला धावणारी ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस- बल्हारशाह विशेष, ३० ऑगस्टची १७६४१ काचीगुडा नरखेड एक्सप्रेस, ०११२८ बल्हारशाह एलटीटी विशेष, १११२१ भुसावळ- वर्धा एक्स्प्रेस, २२११७ पुणे अमरावती एक्सप्रेस, - १२१११ मुंबई - अमरावती एक्स्प्रेस, १२११२ अमरावती मुंबई एक्स्प्रेस, - नागपूर १२१३६ नागपूर - पुणे एक्स्प्रेस, १७६४२ नरखेड काचीगुडा एक्स्प्रेस, तर ३१ ऑगस्टला धावणारी १९१२२ वर्धा भुसावळ एक्स्प्रेस, २२११८ अमरावती - पुणे एक्स्प्रेस, ०९३६५ भुसावळ- बडनेरा पॅसेंजर विशेष, ०९३६६ बडनेरा - भुसावळ पॅसेंजर विशेष, १२१३५ पुणे - नागपूर एक्स्प्रेस अशा १४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधांच्या आवश्यक कामासाठी ब्लॉक घ्यावा लागला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.