६ कोटी ६०लाख रुपयांच विकासाच दालन विंधणे ग्रामपंचायतीच्या दारात - आमदार महेश बालदी
६ कोटी ६०लाख रुपयांच विकासाच दालन विंधणे ग्रामपंचायतीच्या दारात - आमदार महेश बालदी
बोरखार येथे विंधणे ग्रामपंचायत मधील विविध विकास कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन.
उरण (सुनिल ठाकूर )विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रथमच ६ कोटी ६० लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून विकासाच दालन ग्रामपंचायतीच्या दारात आलं आहे.त्या विकास निधीतील विविध कामांचे भूमिपूजन सोहळा हा या ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडत आहे.याचा या मतदारसंघातील लोकसेवक म्हणून मला अभिमान वाटत आहे.असे प्रतिपादन उरणचे आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केले.
उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विंधणे ते बोरखार रस्ता डांबरीकरण करणे -४ कोटी ५० लाख रुपये, विंधणे ते खालचा पाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे -४० लाख रुपये, बोरखार येथील रंगमंच सुशोभित करणे- २० लाख रुपये, बोरकर येथील सभामंडप बांधणे -१५ लाख रुपये, बोरखार येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे -२० लाख रुपये,टाकीगाव येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे - २० लाख रुपये, टाकीगाव येथे स्मशानभूमी बांधणे -१० लाख रुपये,धाकटी जुई येथे सभामंडप बांधणे- १० लाख रुपये,धाकटी जुई येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे २० लाख रुपये,खा.पाडा विंधणे येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे २० लाख रुपये, विंधणे ( बौध वस्ती )येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे व स्ट्रीट लाईट बसवणे - ३० लाख रुपये निधी मंजूर करुन सदर विकास कामांचे भूमिपूजन सोहळा रविवारी ( दि२०) उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने पार पडला.आणि निवडणुकीच्या माध्यमातून दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली आहे.
उरण तालुक्यातील बोरखार हे जेएनपीए बंदराच्या हाकेच्या अंतरावर असलेले विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनारी वसलेले एक दुर्गम गाव आहे.अशा गाव परिसराचा संपर्क हा तालुक्यातील विकसित भागाशी जोडता यावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रखडलेल्या बोरखार खाडी पुल ते गोवा महामार्गाला जोडणाऱ्या दोन पदरी रस्त्यासाठी सुमारे ४ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार असून तेही काम लवकरच मार्गी लागणार आहे.त्यामुळे बोरखार परिसराचा कायापालट झाल्या शिवाय राहणार नाही.असे शेवटी आमदार महेश बालदी यांनी नमूद करत, विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रथमच ६ कोटी ६० लाख रुपये व बोरखार खाडी पुलावर पुल उभारण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतल्याने बोरखार परिसरातील दानशूर व्यक्ती तथा समाजसेवक तेजस डाकी यांनी आमदार महेश बालदी यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार केला.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रवि भोईर, जेष्ठ नेते अरुण नाईक, जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, विंधणे सरपंच सौ. निसर्गा रोशन डाकी,सदस्य सुरज म्हात्रे,उरण पंचायत समिती मा. सदस्य सौ.दिक्षा प्रसाद पाटील, उद्योगपती संदिप पाटील, सामाजिक कार्यकर्ते समिर मढवी, ,विभाग अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे,प्रकाश ठाकूर, किसान तालुका अध्यक्ष पांडुरंग पाटील,धुतुम चे माजी सरपंच धनाजी शेठ ठाकूर,बोरखार ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष तेजश डाकी,कान्हा ठाकूर, मनोज ठाकूर, सुनील पाटील, शैलेश गावंड, अतुल ठाकूर, युवा अध्यक्ष निलेश पाटील,प्रकाश घरत,जीवन डाकी,सदस्य वेश्वी अजित पाटील, विद्याधर मुंबईकर,प्रविण घरत, मनोहर जोशी, सुधाकर नाईक, संजय कोळी, दिपक ठाकूर, संदिप नाईक सह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले. तर निवेदन व आभार शैलेश गावंड यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत