Header Ads

Header ADS

पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी इर्शाल वाडी येथील दुर्घटना ग्रस्त भागाची केली पाहणी,मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन,मदतीचा हात

 

Party-leader-Pritam-Mhatre-inspected-the-accident-affected-area-at-Irshalwadi,-consoled-the-relatives-of-the-deceased,-helped-hands

पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी इर्शाल वाडी येथील दुर्घटना ग्रस्त भागाची  केली पाहणी,मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन,मदतीचा हात

उरण (सुनिल ठाकूर )रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. माळीण आणि तळीये दुर्घटनेची आठवण करून देणाऱ्या या घटनेने राज्य हादरलंय. इर्शाळवाडीत दरड कोसळून १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणाची पाहणी करून नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. तसेच मदतीसाठी ८३३४०५०५०५ / ८७९६६३९६६५ या क्रमांकावर मदत साधण्याचे आवाहन केले आहे.




  इर्शाळवाडी येथे मा विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी जाऊन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी

 केली. यावेळी त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी श्री शिवराम म दूमणे यांचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. युद्ध पातळीवर एन. डी. आर. एफ टीम, प्रशासन, सामाजिक संस्था तसेच स्थानिक नागरिक यांच्या कडून बचाव व मदत कार्य सुरु आहे. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून प्रशास- नाला मदतकार्यात आवश्यक मदत करीत आहे. मदतकार्य करणारे NDRF टीम, पोलीस बांधवांना तसेच सामाजिक सेवकांना श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ येथे अन्नसेवा आणि राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच मदत कार्य करणाऱ्या सेवकांना कुठलीही मदतीची आवश्यकता असेल तर त्यांनी ८३३४०५०५०५ / ८७९६६३९६६५ या क्रमांकावर संपर्क साधावे. असे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.