गरजू विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या दुप्पट फी वाढीचा बसणार फटका
गरजू विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या दुप्पट फी वाढीचा बसणार फटका
लेवाजगत न्यूज अकोला-ज्ञानगंगा घरोघरी, असे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने सर्वच अभ्यासक्रमाची प्रवेश फी दुप्पट केली आहे. यामुळे अनेक गरजू शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू शकतात. याचा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदद्वारा विरोध करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे फी दर वाढीचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ मागे घ्यावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिव यांना ई- मेलद्वारे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदद्वारा देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संघटक आकाश हिवराळे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत