Header Ads

Header ADS

अल्पवयीन बहीण भावामुळे गर्भवती,नात्याचा कलंक DNA चाचणीत उघड

Minor-sister-brother mu-pregnant-relationship-taint-exposed-in-DNA-test


अल्पवयीन बहीण भावामुळे गर्भवती,नात्याचा कलंक DNA चाचणीत उघड 

वृत्तसंस्था छत्रपती संभाजी नगर -सख्ख्या भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीशी ठेवलेले अनैतिक संबंध डीएनए चाचणीत उघड झाले. प्रकरणात पीडितेच्या भावासह मावस भावजीवर बलात्कार व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित मावस भावजीवर आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. जी. मेहरे यांनी त्यांना जामीन मंजूर केला.

     गंगापूर तालुक्यातील पीडित अल्पवयीन मुलीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मावस भावजीने ऑक्टोबर २०२२ मध्ये आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे म्हटले होते. मात्र नंतर पीडितेने २४ मार्च २०२३ राेजी पुरवणी जबाबात सख्ख्या भावाने शारीरिक संबंध ठेवल्याचे म्हटले. नाताळच्या सुट्यात दहा दिवस भाऊ घरी होता. त्यादरम्यान वेळोवेळी त्याने शारीरिक संबंध ठेवले. मला मासिक पाळी आली नसल्याचे आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिने प्रेग्नंट किट आणून तपासणी केली. त्यात गरोदर असल्याचे लक्षात आले. ही बाब भावाला सांगितल्यावर त्याने एका रुग्णालयात सोनोग्राफी केल्यानंतर चार महिन्यांची गरोदर असल्याचे निदर्शनास आले.भावाने दिली जीव देण्याची धमकी : बहीण गभर्वती राहिल्यानंतर त्याने तिला धमकी दिली. ‘ही बाब कुणाला सांगितली तर मी जीव देईल,’ अशी धमकी त्याने दिली होती. या प्रकरणात दुसरे कुणाचेही नावे घे, माझे नाव घेऊ नकोस म्हणून भावाने धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले होते. प्रकरणात भाऊ व मावस भावजीच्या विरोधात भादंवि कलम ३७६ (२) (एन), (एफ), (जे) ५०६, ३४ आणि पॉक्सो कलम ४, ५ (जे) (२) (एल) (एन) ६,८,१२ नुसार गुन्हा दाखल केला होता.

    मावस भावजीचा जामीन अर्ज वैजापूर कोर्टाने फेटाळला होता. याविरोधात अॅड. रवींद्र गोरेंमार्फत खंडपीठात धाव घेतली. पीडितेचे भावासाेबत अनैतिक संबंध होते, मावस भावजीचा संबंध नाही असा युिक्तवाद केला. त्यावर खंडपीठाने जामीन मंजूर केला. अॅड. गोरे यांना अॅड. पल्लवी वांगीकर व अॅड. चंद्रकांत बोडखे यांनी साहाय्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.