जळगांवचे नवीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ,अमन मित्तल यांची बदली
जळगांवचे नवीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ,अमन मित्तल यांची बदली
लेवाजगत न्यूज जळगाव - येथील जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली झाली असून शासनातर्फे तसे आदेश शुक्रवारी २१ जुलै रोजी संध्याकाळी काढण्यात आले आहेत. त्यांच्या जागी जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांची नियुक्ती शासनाने केली आहे. दरम्यान अमन मित्तल यांची बदली कोठे झाली याबाबत आदेशात नमूद नाही. तर आयुष प्रसाद यांना मित्तल यांच्या जागी तातडीने कार्यभार स्वीकारावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत