Header Ads

Header ADS

ऐतिहासिक मशीद, मदरसा संदर्भात सुनावणी: एरंडोल शहरात दिवसभर तणावपूर्ण शांतता; आता २७ रोजी सुनावणी होणार

 

Historic-mosque-madrasa-regarding-hearing:- day-long-tense-silence-in-Arandol-city-hearing-to-be-held-on-27th-now

ऐतिहासिक मशीद, मदरसा संदर्भात सुनावणी: एरंडोल शहरात दिवसभर तणावपूर्ण शांतता; आता २७ रोजी सुनावणी होणार

लेवाजगत न्यूज एरंडोल -येथील ऐतिहासिक पांडववाड्यातील मशीद, मदरसा संदर्भात दाखल याचिकेवर जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच न्यायालयात सुनावणी असल्याने मंगळवारी एरंडोल शहरात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. पाडववाड्यासह सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात आता २७ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे जाहीर झाल्याने सायंकाळी सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

Historic-mosque-madrasa-regarding-hearing:- day-long-tense-silence-in-Arandol-city-hearing-to-be-held-on-27th-now


       मंगळवारी सकाळपासूनच एरंडोल शहरात शांतता होती. पोलिस प्रशासनातर्फे दंगा नियंत्रण पथकाचे वाहन शहरात ठिकठिकाणी उभे करण्यात आले होते. पोलिस प्रशासनाचे वाहन शहरात गस्त घालत असल्याने शहरातील नागरिक, मजूर वर्ग घराबाहेर न पडता घरीच बसून होते. शहरातील सर्व नागरिकांना निकालाची प्रतीक्षा लागून होती. परंतु निकाल २७ तारखेला येणार असल्याचे जाहीर होताच नागरिकांनी सुटकेच्या नि:श्वास सोडला. पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांना प्रशासनाकडून सहकार्य करण्याबाबत सांगण्यात आले. शहरात शांतता राहण्यासाठी विविध सामाजिक संघटनाकडून देखील प्रयत्न सुरू आहेत. पांडववाडा सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एरंडोलला लावलेला बंदोबस्त.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.