Header Ads

Header ADS

गावावर दरड कोसळली १०० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

 

Gāvāvara-daraḍa-kōsaḷalī-100-jaṇa-ḍhigāṟyākhālī-aḍakalyāchī-bhītī

गावावर दरड कोसळली १०० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती 

लेवाजगत न्यूज रायगड-कोकणात पावसामुळे हाहाकार उडाल्याची स्थिती आहे. जोरदार पावसामुळे रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. आतापर्यंत चार जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर, १०० हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

Gāvāvara-daraḍa-kōsaḷalī-100-jaṇa-ḍhigāṟyākhālī-aḍakalyāchī-bhītī


    खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली आहे. वसाहतीत आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून ६ किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे.

    ३० ते ४० घरे ढिगाऱ्याखाली

     रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरड कोसळलेल्या इर्शाळवाडी गावात ५० ते ६० घरे असून गावात जवळपास २०० ते ३०० मतदार म्हणजेच १८ वयापुढील नागरिक आहेत. जवळपास ३० ते ४० घरातील लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. यातील जवळपास ६० जणांचा मृत्यू झाल्याची भीती रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक व एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्याला सुरूवात केली आहे. काही जणांना वाचवण्यात यश आले आहे.

    कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे घटनास्थळी पोहोचले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचणार आहेत. आतापर्यंत सुमारे २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाजवळच हे गाव असून धरण परिसरातील घरांवरच दरड कोसळल्याची माहिती आहे.

     रात्री १०.३० ते ११ सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, अंधार व पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. तसेच, गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे बचावपथकाला अक्षरश: पायी चिखल तुडवून गावापर्यंत जावे लागत आहेत. त्यामुळे रात्री बचावकार्य थांबवण्यात आले होते. तसेच, रात्री मदतीसाठी जात असताना अग्निशमनदलाच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. सकाळ होताच वेगाने बचावकार्य सुरू झाले आहे. आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, जवळपास ६० जणांचा मृत्यू झाल्याची भीती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

    मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, इर्शाळवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. पावसामुळे जी पायवाट आहे, ती पूर्ण चिखलात गेली आहे. बचावपथकांनाही पायीच तेथे जावे लागत आहे. जेसीबी, पोकलेनही घटनास्थळी नेणे शक्य होत नाहीये. त्यामुळे बचाव पथकाचे सदस्य अक्षरश: हातानेच ढिगारे उपसत आहेत. गावापर्यंत मदतीचे साहित्य कसे न्यावे, हा आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली सापडलेल्या मृतदेहांचे गावातच शवविच्छेदन करण्याचा विचारही आम्ही करत आहोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.