बदलापूर- अंबरनाथ मधील रेल्वे रुळांचे जलमय Video पाहा ,मुंबई लोकल ट्रेन सेवा ठप्प मुंबई पुणे दहा रेल्वे रद्द
बदलापूर- अंबरनाथ मधील रेल्वे रुळांचे जलमय Video पाहा ,मुंबई लोकल ट्रेन सेवा ठप्प मुंबई पुणे दहा रेल्वे रद्द
लेवाजगत न्यूज बदलापूर-गेल्या २४ तासात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलच्या वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे. सोशल मीडियावर संतप्त प्रवासी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडीओ फोटोच्या माध्यमातून ट्रेनचे अपडेट्स शेअर करत आहेत. दरम्यान, बदलापूर रेल्वे स्थानक आणि अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने बदलापूरहून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा पुढील सूचनेपर्यंत बंद करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून स्थानकावर दिली जाते आहे. बदलापूर ते अंबरनाथ मधील रेल्वे रुळाचे काही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
व्हिडीओ बघा-अंबरनाथ बदलापूर रेल्वे ट्रॅकवर पाणी उल्हास नदी वाहते पुलावरून वाहतूक विस्कळीत
प्राप्त माहितीनुसार, कल्याण, डोंबिवली परिसरात मागील तीन तासात जोरदार पाऊस झाला आहे. विठ्ठलवाडी परिसरात मागील तीन तासात ५७ मिमी तर कल्याण शहरात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. डोंबिवली परिसरातही मागील तीन तासात ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बदलापूर- अंबरनाथ मधील रेल्वे रूळ जलमय
दरम्यान, मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडले असून पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला मोठा फटका बसला आहे. पनवेल ते बेलापूर दरम्यान वाहतूक ठप्प आहे. तर अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूकदेखील बंद आहे. मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असल्याने सर्वच ट्रेन आता उशिराने धावत आहेत.
मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेन आता उशिरानं धावत आहेत. लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाल्यानं चाकरमान्यांना कामावर जाताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही स्थानकात रेल्वे मार्गावरील ट्रेन सध्या सुरू आहेत मात्र अत्यंत धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे.
ठाणे जिल्ह्यासाठी आॅरेंज अलर्ट जारी
कल्याण, डोंबिवली परिसरात मागील तीन तासात धुवाधार पाऊस झाला आहे. विठ्ठलवाडी परिसरात मागील तीन तासात ५७ मिमी पाऊस तर कल्याण शहरात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तिकडे, डोंबिवली परिसरात देखील मागील तीन तासात ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार आहे. ठाणे जिल्ह्यासाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे अंबरनाथ-बदलापूर विभागातील रेल्वे वाहतूक बंद
12123 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - डेक्कन क्वीन (19 जुलै)
12124 – पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - डेक्कन क्वीन (20 जुलै)
11009 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - सिंहगड एक्स्प्रेस (19 जुलै)
11010 – पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सिंहगड एक्स्प्रेस (20 जुलै)
11008 - पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - डेक्कन एक्स्प्रेस (19 जुलै)
11007 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - डेक्कन एक्स्प्रेस (20 जुलै)
12128 - पुणे - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (19 जुलै)
12127 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (20 जुलै)
22106 - पुणे - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस (19 जुलै)
22105 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस (20 जुलै)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत