कुलर दुरुस्ती करताना शॉक लागून डांभुर्णीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
कुलर दुरुस्ती करताना शॉक लागून डांभुर्णीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
लेवाजगत न्यूज यावल-तालुक्यातील डांभुर्णी येथे कुलर दुरुस्तीचे काम करताना शॉक लागून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शॉक लागल्याने कोसळताच त्याला तातडीने यावल येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.
डांभुर्णी येथील रहिवासी निकेश दिनकर नेहेते हा तरुण इलेक्ट्रिक दुरुस्ती व फिटिंगचे काम करतो. सोमवारी तो गावातील बाळ गोपाळ कोळी यांच्या घरी कुलर दुरुस्त करण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक शॉक लागून तो जमिनीवर कोसळला. यानंतर त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी धवल नेहेते यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अस्लम खान करत आहे. मृताच्या पश्चात आई, मोठा भाऊ असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत