तहसीलदार बंडू कापसे व राजेश वानखेडे रात्री पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर
तहसीलदार बंडू कापसे व राजेश वानखेडे रात्री पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर
लेवाजगत न्युज सावदा:- रविवार दिनांक 4 रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान सावदा परिसरात झालेल्या वादळी पावसासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासकीय सुट्टी असल्याने तहसीलदार बंडू कापसे हे जळगाव येथे परीक्षेसाठी उपस्थित होते त्यामुळे दुपारी येऊ शकले नव्हते.
सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी दूर ध्वनीद्वारे प्रांत अधिकारी कैलास कडलक व तहसीलदार बंडू कापसे यांना कळवली होती. त्यामुळेच कर्तव्यदक्ष तहसीलदार हे रात्री आठ वाजता शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थित राहून पाहणी केली या पाहणी दरम्यान शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले झाले आहे त्यामुळे त्यांनी त्वरित उद्यापासून पंचनामे करावे असे आदेश मंडळ अधिकारी वानखेडे यांना दिले आहे.
यावेळी वेगवान वाऱ्यांचा देखील शेतकऱ्यांनी कापसे यांच्याकडे केली यावेळी सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे कोचुर येथील शेतकरी कमलाकर पाटील सावदा येथील शेतकरी संपत महाजन,अशोक धर्मा महाजन, अरुण विठ्ठल बडे, किरण चौधरी,निलेश चौधरी, यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत