सावद्यात शुक्रवार रोजी हिंदू साम्राज्य उत्सव दिनानिमित्त व्याख्यान -उपस्थितीचे आवाहन
सावद्यात शुक्रवार रोजी हिंदू साम्राज्य उत्सव दिनानिमित्त व्याख्यान -उपस्थितीचे आवाहन
लेवाजगत न्यूज सावदा -येथे ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६ रोजी रायगडावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.३५० वा शिवराजभिषेक सोहळा , छत्रपतींचा राज्याभिषेक हा धर्म संस्कृती आणि समाजाच्या संरक्षणासाठी होता. अनेक वर्ष चाललेल्या हिंदूंच्या संघर्षाची विजय गाथा होती. हिंदू समाजात आत्मविश्वास निर्माण करणारा होता म्हणून हा दिवस हिंदू साम्राज्य दिन आहे.
देव,देश,धर्म रक्षणार्थ लढण्याचे समर्थ देणारा प्रेरणा देणारा, नवचैतन्य निर्माण करणारा हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत.
यानिमित्त सावदा येथील गांधी चौकात या दिनानिमित्त जामनेर येथील प्राध्यापक श्री योगेश अनिल देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्वस्तिक स्वीट उपारगृहाचे संचालक मयूर शांतीलाल जैन उपस्थित राहतील. कार्यक्रम २ जून शुक्रवार रोजी संध्याकाळी ७ वाजता गांधी चौक येथे होईल. तरी सर्व नागरिकांनी या विशेष कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत