संदल शरीफनिमित्त सावदा शहरात आज भंडाऱ्याचे आयोजन, भव्य मिरवणूक निघणार
संदल शरीफनिमित्त सावदा शहरात आज भंडाऱ्याचे आयोजन, भव्य मिरवणूक निघणार
लेवाजगत न्यूज सावदा- येथील हजरत पीर मंजनशाह बाबा दर्गाह येथील संदलनिमित्त ७ रोजी सकाळी १० वाजेपासून शहीद अब्दुल हमीद ग्रुप शेख पुरा सावदातर्फे भंडाऱ्याचे आयोजन केले आहे. दरवर्षी येथे भाविकांसाठी भंडाऱ्यांचे आयोजन केले जाते. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. कारण हजरत पीर मंजनशाह बाबांवर भाविकांची श्रद्धा आहे. यानिमित्त सायंकाळी ५ वाजेला पीर मंजन शाह बाबा यांच्या संदलची मिरवणूक निघेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत