Header Ads

Header ADS

केसीई बीएड काॅलेज मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

KCE-BEd-College-in-Plantation-Programme-Complete


 केसीई  बीएड काॅलेज मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 लेवाजगत न्यूज जळगाव - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केसीई सोसायटीच्या बी एड महाविद्यालयात प्राध्यापक साहेबराव भुकन अधिषठाता आतरविदयाशाखा कबचौ उमवि यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

        महाविद्यालयाच्या परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी सर्वत्र वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज स्पष्ट केली. महाविदयालयाचे प्राचार्य डाॅ.अशोक राणे ,उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी , डॉ.निलेश जोशी विद्यार्थी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

    सर्वांनी वृक्षारोपण केलेल्या रोपांची काळजी घेण्याची शपथ घेतली. तसेच सुरक्षारक्षक यांनी सुद्धा वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. यासाठी रोहित पाटील, निलेश नाईक, केतन पाटील, मोहन चौधरी, शैलेश कुलकर्णी, निलेश सदाफळे, विजय चव्हाण,शरद सोनार  यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.