Header Ads

Header ADS

माझी वसुंधरा अभियानात सावदा पालिका राज्यात सातवी

 

In my-Vasundhara-campaign- in Savada-Palika-State- seventh

माझी वसुंधरा अभियानात सावदा पालिका राज्यात सातवी 

लेवाजगत न्यूज सावदा-शासनातर्फे माझी वसुंधरा अभियान ३. ० राबवण्यात आले होते. त्यात राज्यातील १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या असलेल्या गटात राज्यातील ९४ पालिकांनी सहभाग नोंदवला आहे. या अभियानाच्या मूल्यमापनात सावदा पालिकेला ४४५६ गुण मिळाले. त्याच्या आधारे पालिकेने राज्यात सातवा आणि नाशिक विभागात चौथा क्रमांक मिळवला. या यशाबद्दल माजी नगरसेवकांनी पालिका प्रशासनाचे कौतुक केले. तर मुख्याधिकारी किशोर चव्हाण व आरोग्य अधिकारी सचिन चोळके, अरुणा चौधरी यांनी सावदा शहरातील नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे अभियानात चांगली कामगिरी करता आली असे सांगितले. तसेच भविष्यात या अभियानात चांगली  कामगिरी करू असे सांगितले.

iti


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.