सावद्यामध्ये शासन आपल्या दारी उपक्रम शिबिरात २०६ दाखल्यांचे वाटप
सावद्यामध्ये शासन आपल्या दारी उपक्रम शिबिरात २०६ दाखल्यांचे वाटप
लेवाजगत न्यूज सावदा-महसूल विभागाने रावेर तालुक्यात शासन आपल्या दारी उपक्रम हाती घेतला आहे. त्यात विद्यार्थी व गरजूंना आवश्यक दाखले मिळावे यासाठी मंगळवारी एसएजी हायस्कूलमध्ये शिबिराचे आयोजन केले होते. त्यात एकूण २०६ अर्जदारांना मागणीप्रमाणे दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
शिबिरासाठी रावेर तहसील कार्यालय व पालिका संचालित श्री. आ. गं. हायस्कूलने पुढाकार घेतला. शिबिरात विद्यार्थ्यांसह नागरिकांनी जातीचे, अधिवास दाखले व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले व इतर कागदपत्र काढण्यासाठी प्रक्रिया पार पडली. हे दाखले काढण्यासाठी एरवी तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, ही सेवा शाळेतील शिबिरात मिळाली. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर त्यांना तत्काळ दाखले देण्यात आले. उत्पन्नाचे १४८, नॅशनॅलिटी ३, डोमिसाईल ४, नॉन क्रिमिलेयर २०, जातीचे दाखले ३, बोनाफाईड २८ असे दाखले नोंदणी करून सायंकाळी सेतू केंद्रामार्फत वाटप झाले. मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे, सावदा मंडळ अधिकारी प्रवीण वानखेडे, तलाठी शरद पाटील, ओमप्रकाश मटाले, प्रोमेस चोपडे, मुबीन मोमीन, आपले सेवा केंद्राचे संचालक उपस्थित होते. मस्कावद, उदळी, थोरगव्हाण, गाते या गावांमधील निराधार अनुदान व वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थीचे उत्पन्न व हयातीचे दाखले भरले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत