Train Accident कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात 50 मृत्यू, 132 जखमी
Train Accident कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात 50 मृत्यू, 132 जखमी
लेवाजगत ब्रेकिंग न्युज:- कोरोमंडल एक्स्प्रेसला ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनंगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवार, 2 जून, 2023 रोजी अपघात झाला. एक्सप्रेस ट्रेनच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्या आणि अनेक प्रवासी जखमी झाले. बचाव कार्य सुरू झाले आहे. आणि साइटवरील व्हिज्युअलमध्ये अनेक लोक प्रक्रियेत मदत करत असल्याचे दिसून आले आहे.Odisha Train Accident LIVE: Over 50 feared dead as 3 trains derail at Balasore
कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात 50 मृत्यू, 132 जखमी, घटनास्थळाचे भयावह
ओडिसामध्ये ट्रेनचा मोठा अपघात झाला आहे. बालासोरच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर टक्कर झाली.
ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस समोरून येणाऱ्या मालगाडीला धडकल्यामुळे हा अपघात झाला.
या अपघातामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 132 जण जखमी झाले आहेत, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. या जखमींना सोरो सीएचसी, गोपालपुर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
अपघातामध्ये एकूण 15 डबे रुळावरून घसरले, तर 7 डबे उलटले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रेनचे 4 डबे रेल्वे बाऊंड्रीच्याही बाहेर गेले.
कोरोमंडल एक्स्प्रेस (12841)पश्चिम बंगालच्या शालिमार स्टेशनहून चेन्नईसाठी निघाली होती. बालासोरला संध्याकाळी 6.30 वाजता ट्रेन पोहोचली होती.
उद्या दुपारी 4.50 मिनिटांनी ट्रेन चेन्नईला पोहोचणार होती. ट्रेनच्या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यालाही सर्व आवश्यक व्यवस्था करायला आणि घटनास्थळी पोहोचायला सांगितलं आहे, असं विशेष मदत आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच अधिकच्या मदतीची आवश्यकता असेल तर एसआरसीला सूचित करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. एसआरसीने आपत्कालिन कंट्रोल रूमचा नंबरही जाहीर केला आहे : 0678 2262286
रेल्वे ट्रॅकवर सिग्नल खराब झाल्याने दोन्ही गाड्या एकाच रुळावर आदळल्या, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहेत.Odisha Train Accident LIVE: Over 50 feared dead as 3 trains derail at Balasore
कोणत्याही टिप्पण्या नाहीत