आमोदा येथिल घ का विद्यालयाचा निकाल ९५.३० टक्के
आमोदा येथिल घ का विद्यालयाचा निकाल ९५.३० टक्के
लेवाजगत न्यूज आमोदा तालुका यावल- येथील घनश्याम काशीराम विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला असून त्यामध्ये प्रथम क्रमांकाने डिंपल प्रकाश सरोदे हिला ९३.४०% तर द्वितीय क्रमांक आम्रपाली नवल तायडे हिला ९०.८०% तर तृतीय क्रमांक मानसी नटवरलाल जावरे हिला ९०.२०% मार्क पडले तसेच प्रथम क्रमांकाने आलेली डिंपल प्रकाश सरोदे हिची हालाखीची परिस्थिती असून वडील हे दहा वर्षांपूर्वीच निधन झाले तिची आई मनीषा हिने मोलमजुरी करून तिला आजपर्यंत कोणतीही वडिलांची कमतरता भासू न देता व तिच्या परिश्रमाने आज तिचा प्रथम क्रमांक आला त्यामुळे परिसरामध्ये तिचे कौतुक करण्यात येत असून संस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील ,उपाध्यक्ष विनायक पाटील, चेअरमन ललित महाजन व सेक्रेटरी उमाकांत पाटील व सर्व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजीव बोठे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत