आमदाराकडे चालकानेच मागितली ३० लाखाची खंडणी
आमदाराकडे चालकानेच मागितली ३० लाखाची खंडणी
वृत्तसंस्था नांदेड -जिल्ह्यातील लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील घरातून ३५ लाख रुपयांची रोकड चोरी करत त्यांच्याकडेच ३० लाखांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्यांचा वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चक्रधर मोरे असे पोलिसांनी नांदेडमधून अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. आमदार शिंदे यांच्या जोशी मार्गावरील अपोलो मिल कम्पाडंच्या लोढा बॅलोसिमो को-ऑप हौ. सोसायटीमधील ३९ व्या मजल्यावर फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये चोरी झाली असून २५ लाखांची रोकड चोरी झाल्याची घटना समोर आली होती. तर ही चोरी त्यांच्याच गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या चक्रधर मोरे याने केली होती. यानंतर त्यांचा चालक मोरे हा नॉटरिचेबल झाला होता.
यानंतर काही दिवसांनी आमदार शिंदे यांना चालक मोरे याने कॉल करत ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यामुळे आमदार शिंदे यांनी एन.एम. जोशी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. यानतंर पोलिसांनी तपास करत संशयित आरोपी मोरेला अटक केली होती.
गेली अनेक दिवस मोरे हा आमदार शिंदे यांचा चालक म्हणून काम करत होता. त्यांची घरात ये जा असल्याने त्याला घरातील सर्व गोष्टी माहिती होत्या. याचाच फायदा घेत त्यांने घरातील २५ लाख रुपयांची रोकड पळविली. तर काही दिवसानंतर त्यांने आमदाराला माझ्या पत्नीजवळ ३० लाख रुपये द्या नाहीतर माझ्या जीवाचे काही तरी बरे वाईटकरुन घेत तुमची बदनामी करेल अशी धमकी देत खंडणीची मागणी केली आहे. तर १ एप्रिल ते ७ मे दरम्यान ही सर्व घटना घडल्याचे आमदार शिंदे यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद शिंदे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत