Header Ads

Header ADS

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आधार उपडेट नसल्यास गुणपत्रिका मिळणार नाही

 

10th-12th-students-will-not-get-mark-sheet-without-adhar-update

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आधार उपडेट नसल्यास गुणपत्रिका मिळणार नाही 

वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर -दहावी-बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांचे आधार अपडेट, प्रमाणिकरण नसेल तर त्यांना गुणपत्रिका दिल्या जाणार नाहीत, असे सूचना पत्र माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अन शैक्षणिक संस्थाच्या अडचणीत वाढ होणार आहेे. 

    गेल्या तीन-चार महिन्यांपासून वारंवार शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी आधार अपटेड संचमान्यतेसाठी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असतांना देखील अजूनही मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन करणे, अद्यावत करणे, अपडेट ही प्रक्रिया करण्यात आलेली नाही.

    यामुळे पुढील प्रवेश निश्चित करण्यासाठी ज्या मुळ कागदपत्रांची गरज विद्यार्थ्यांना लागते त्यासाठी आता अडचण होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील सर्व स्पष्ट सूचना माध्यमिक शिक्षण विभाागने दिल्या आहेत.

    माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला आहे. तर दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना ५ जून रोजी गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे.

    मात्र आता शंभर टक्के आधार प्रमाणीकरण झालेल्या शाहा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्याच गुणपत्रिका देण्यात याव्यात आणि उर्वरित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका रोखून ठेवाव्यात असे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी राज्य व विभागीय शिक्षण मंडळास दिले आहे. 


    शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. तसेच विद्यार्थ्यांना शासनाच्या मिळणाऱ्या सुविधा, शाळा, महाविद्यालयांची सलग्नता, शिक्षक, पट संख्या निश्चितीसाठी संलग्नता आवश्यक असते ही प्रक्रिया दरवर्षी करावी लागते. त्यासाठी आता आधार शंभर टक्के प्रमाणीकरण करणे हे बोगस विद्यार्थी संख्या रोखण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

    छत्रपती संभाजीनग जिल्हा ९० टक्के व्हॅलिडेशन करुन राज्यात १८ व्या क्रमांकावर आहे. जिल्हयातील पैठण, वैजापूर, सिल्लोड आणि फुलंब्री हे तालुके आघाडीवर आहेत. बोगस विद्यार्थी संख्या दाखवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्याच्या विविध खासगी शाळांच्या प्रयत्नांना चाप लावण्यासाठी शासनाने सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शासनाच्या सरल स्टुडण्ट पोर्टल या संकेतस्थळावर अपलोड करुन व्हॅलिडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

     ते शंभर टक्के शाळा, महाविद्यालयांनी करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने केल्या आहेत. ज्या शाळांचे ८० टक्के पेक्षा कमी विद्यार्थी व्हॅलिडेशन झालेले आहे. अशा शाळांची यादी माध्यमिक शिक्षण विभागाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास कळवली असून, निकाल जाहिर झालेल्या अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे गुणपत्रक आता दिले जाणार नाही असे पत्रात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.