Header Ads

Header ADS

नालासोपाऱ्यात व्यायाम प्रशिक्षकाचा श्वास कोंडल्याने दुर्दैवी मृत्यू

 

नालासोपाऱ्यात व्यायाम प्रशिक्षकाचा श्वास कोंडल्याने दुर्दैवी मृत्यू

नालासोपाऱ्यात व्यायाम प्रशिक्षकाचा श्वास कोंडल्याने दुर्दैवी मृत्यू

लेवाजगत न्यूज वसई :- नालासोपाऱ्यात व्यायाम प्रशिक्षकाचा श्वास कोंडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. देविदास विनायक जाधव (३५) असे या प्रशिक्षकाचे नाव आहे. नालासोपारा पश्चिम, यशवंत गौरव येथील शालिभद्र यश अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या देविदास जाधव याला १ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत घरच्यांनी व इमारतीमधील लोकांनी नालासोपारा येथील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

   मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले आहे. देविदास हा नालासोपारा पश्चिम नाळा डिसिल्वानगर येथील ‘द फिटनेस कार्डेस’ या व्यायाम शाळेत तरुणांना व्यायामाचे धडे देत होते. व्यायाम प्रशिक्षकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.