Header Ads

Header ADS

स्टेट बँक मॅनेजरचा खून गळ्यावर वार

स्टेट बँक मॅनेजरचा खून गळ्यावर वार   लेवाजगत  न्यूज लोणार


 स्टेट बँक मॅनेजरचा खून गळ्यावर वार 

लेवाजगत  न्यूज लोणार -लोणार तालुक्यातील हिरडव येथील स्टेट बँक शाखेत व्यवस्थापकपदी (मॅनेजर) कार्यरत असलेल्या उत्कर्ष पाटील (३२) यांचा गळ्यावर चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी, १ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेनंतर उघडकीस आली. पाटील यांचा मृतदेह सारंगपूर फाट्यावरील उसाच्या शेतालगत असलेल्या नाल्यात टाकून त्यावर उसाचा पाचोळा, कचरा टाकलेला होता.



   मुंबईतील असलेले उत्कर्ष पाटील यांची तीन महिन्यांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. तीन आठवड्यांपूर्वी प्रतिनियुक्तीवर त्यांना मेहकर भागात पाठवण्यात आले होते. स्टेट बँकेच्या हिरडव शाखेत परीविक्षाधीन व्यवस्थापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. उत्कर्ष पाटील यांनी कौटुंबिक कारणामुळे नोकरीचा राजीनामा सादर केला होता, अशी माहिती आहे. केवळ तीन आठवड्यांपूर्वी या परिसरात रुजू झालेल्या उत्कर्ष पाटील यांचा खून कोणी आणि कशासाठी केला असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

     मारेकऱ्याने ज्या चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केले तोदेखील घटनास्थळी आढळून आला आहे. पाटील यांचा खून शनिवारी, दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री थर्टीफर्स्टच्या पार्टीतून झाला की यामागे अन्य काही रहस्य दडले आहे, हे तपासाअंती स्पष्ट होईल. घटनेची माहिती मिळताच उत्कर्ष पाटील यांची पत्नी व इतर नातेवाईक मेहकर येथे पोहोचले. स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मेहकर येथे दाखल होऊन तपासणी केली. 

     दरम्यान, सोमवारी मेहकर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. प्रथमदर्शनी पाहिल्यास उत्कर्ष पाटील यांच्या गळ्यावर चाकूचे वार आढळून आले. तसेच मृतदेहाजवळ चाकू आढळून आल्याचे पोलिस हेड काँस्टेबल नारायण मान्टे यांनी नमूद केले. त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात आज उत्तरीय तपासणी झाल्यानंतर पाटील यांचा मृतदेह मुंबईला रवाना करण्यात आला.

    मुंबईला जायचे असल्याने दिला होता राजीनामा

२०१४ मध्ये स्टेट बँकेच्या सेवेत दाखल झालेल्या उत्कर्ष पाटील यांनी मुंबईत ८ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांची बुलडाणा येथे कर्ज विभागात बदली करण्यात आली होती. तीन महिन्यांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात दाखल झालेल्या उत्कर्ष पाटील यांना तीन आठवड्यांपूर्वी प्रतिनियुक्तीवर मेहकर परिसरात पाठविण्यात आले होते. राजीनामा सादर केला असल्याने त्यांना एकाच शाखेत न ठेवता आवश्यकता असेल त्या शाखेत पाठविले जात होते. त्यानुसार जानेफळ, हिवरा आश्रम आणि आता हिरडव येथे त्यांना पाठविण्यात आले होते. कुटुंब मुंबईला असल्याने मुंबईला जायचे असल्यामुळे त्यांनी राजीनामा सादर केला होता, अशी माहिती मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.