Header Ads

Header ADS

सातोड अवैध्य उत्खलनाच्या चौकशी साठी मुक्ताईनगर येथे पथक दाखल

 

Sātōḍa-avaidhya-utkhalanācyā-caukaśī-sāṭhī-muktā'īnagara- yēthē-pathaka-dākhala

सातोड अवैध्य उत्खलनाच्या चौकशी साठी मुक्ताईनगर येथे पथक दाखल 

लेवाजगत  न्यूज मुक्ताईनगर -तालुक्यातील सातोड शिवारातील अवैध उत्खनन झाल्याच्या घोटाळ्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी एसआयटीचे पथक सोमवारी दाखल झाले. जमिनीची तपासणी व मोजमाप त्यांच्याकडून झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

    नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील अधिवेशनात आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्षवेधी मांडून सातोड शिवारातील ३३ हेक्टर जमिनीवर अवैध उत्खनन करण्यात आल्याची तक्रार केली होती. ही जमिन माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावे असून सुरूवातीला तीला शालेय उपयोजनांसाठी परवानगी देण्यात आलेली होती. नंतर जमिनीला कृषक परवाना देण्यात आला. त्यातून लाखो रुपयांची गौण खनिज वाहून नेण्यात आला असून ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. 

     विखेंनी दिले होते आदेश

महसूलमंत्री विखे-पाटील यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारपासून कार्यवाहीला सुरुवात झाली. दुपारी सातोड शिवारातील संबंधित जागेची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र पथक दाखल झाले. त्यांच्यासोबत प्रांताधिकारी रामसिंग सुलाने हेदेखील उपस्थित होते. तपासणी पथकाने जमिनीवर मोजमाप करून उत्खननाची माहिती घेतली. मात्र, अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देण्यात टाळाटाळ केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.