सोरायसिस बरा होतो का ?-डॉ सुशांत शशिकांत पाटील
सोरायसिस बरा होतो का ?-डॉ सुशांत शशिकांत पाटील
आपण बघतो की काही व्याधी जीवनशैलीला आधारून असतात. सामान्य जीवनशैली ही व्यस्त जीवनशैली याला विपरीत अशी असू शकते आणि या विपरीत जीवनशैलीने अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात. अशा रीतीने ज्यावेळी जीवनशैली विकारात मोडतात त्यांना लाइफस्टाइल डिसऑर्डर असं म्हटले जाते. सोरायसिस हा जीवनशैलीविकारांमधील एक व्याधी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात सोरायसिस स्वीकाराची उपस्थिती फारशी अस्तित्वात नव्हती. 80 आणि 90 च्या दशकात ही स्थिती निर्माण झाली की सोरायसिस हा बऱ्याच लोकांना व्हायला लागला. कॉर्पोरेट सेक्टर भारतात आल्याबरोबर अत्यंत व्यस्त तसेच तणावपूर्ण जीवन निर्माण झाले. आणि याचा परिणाम म्हणूनच सोरायसिस सारख्या जीवनशैली विकारांचा प्रादुर्भाव झाला ,आता वर्तमान स्थिती ही आहे की सोरायसिस हा अत्यंत सामान्यतः आढळणारा व्याधी होऊन गेलेला आहे. याचा इतक्या मात्रेत प्रचार आणि प्रसार झाला की अनेक लोक तर घरातच याचं निदान करायला लागले आणि केवळ पुष्टी साठी डॉक्टरच्या जवळ जायला लागले. याची दहशत तर एवढी आहे की सामान्य लोक थोडासा चक्ता पण आला थोडंसं चक्तांदळ जरी उठलं तरी त्याला सोरायसिस मानून घेतात.
मनुष्य शरीरामध्ये सोरायसिस उत्पन्न होण्याचे निश्चित स्थान असे कुठलेही नाही. कोणाच्या शरीरामध्ये सोरायसिस हा डोक्यापासून सुरू होतो तर कोणाच्या शरीरामध्ये हा संधी पासून सुरू होतो तर कोणाच्या शरीरामध्ये हातापायाच्या तळव्यांपासून सुरू होतो. अनेकांच्या शरीरात गुप्त अंग तसेच बगला पोट यातही सोरायसिस आढळून येतो. या खाजेसारख्या आणि वृक्ष ठिकाणाचे सुरुवात एका सामान्य खाजेपासूनही सुरू झालेली असू शकते.
उत्पन्न झाल्यानंतर हा अधिकांशतः शरीराच्या छोट्या हिश्यात व्यक्त झालेला दिसून येतो. अनेक वर्ष या क्षेत्रातच तो तिथं तसाच राहतो. अनेक रुग्णांमध्ये मात्र याच्या विपरीत परिस्थिती आढळून येते. अशा रुग्णांमध्ये तो संपूर्ण शरीरामध्ये पसरून जातो. अशावेळी असे अनेक रुग्ण सोरायसिस बद्दल इंटरनेटवर सर्च करायच्या मागे लागून जातात. अनेक स्वतःची चिकित्सा करायला लागून जातात. समदुखी लोकांना भेटून त्यांचा चिकित्सा अनुभव जाणून घेतात. तर अनेक हे आरोग्य पत्रिका तसेच वर्तमानपत्र, स्वास्थ्य संबंधी लिखाण याबद्दल वाचून सोरायसिस निदान आणि उपचार स्वतःच करायला लागतात. परंतु या सर्वांमध्ये एक प्रश्न सर्वांच्याच मनात असतो, म्हणजे सोरायसिस बरा होतो का? आणि दुर्भाग्यवश प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.
सोरायसिस मुख्यता अशा लोकांना होतो की ज्यांच्या जेवणाची वेळ तसेच झोपण्याची वेळ यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची निश्चिती नाहीये. सोरायसिस अशी लोकांना होतो ज्यांच्या जिभेवर स्वतःचं नियंत्रण नाहीये. जे मनात आलं ते खाल्लं स्वतःच्या जिभेची स्वादपूर्ती करणाऱ्या लोकांना देखील सोरायसिस ची शक्यता जास्त असते. जे खात आहोत ते आपल्या स्वास्थ्यासाठी हितकर आहे अथवा नाही इतका विचार देखील लोक बऱ्याचदा करत नाही. बऱ्याचदा लोक दुपारी भोजनाच्या लगेच नंतर झोपूनही जातात. अनेक लोक आंबट, खारट ,तळलेल्या गोष्टी जास्त मात्रेत खातात. आणि इतकं सर्व खाल्ल्यानंतर देखील उचित वेळेवर शरीराचे शोधन म्हणजेच पंचकर्म नाही करत. अशाही लोकांमध्ये सोरायसिस दिसून येतो ज्यांचे जीवन तणावपूर्ण परिस्थितीतून जात आहे.
सोरायसिस ची एक विशेषता आहे, एकदा उत्पन्न झालेला सोरायसिस लवकर ठीक होत नाही. मग तो अल्प प्रमाणात असो या पूर्ण शरीरावर असो. सोरायसिस बद्दलचे हे कडू सत्य पीडित रुग्ण स्वीकारत नाही.
सोरायसिस भले ठीक नाही झाला परंतु रुग्णाने नियमित औषध सेवन केलं अथवा नियमित शरीरशोधन म्हणजेच पंचकर्म केले तर या रोगावर नियंत्रण करणे शक्य होते. व्याधीच्या अशा स्वभावाला आयुर्वेदात याप्य असे म्हटले जाते. अर्थातच जोपर्यंत औषध सेवन चालू आहे तोपर्यंत रुग्णाला आराम पडलेला असतो. जशी औषधी बंद होते, तसे एक दोन महिन्यातच व्याधी पुन्हा लक्षणे उत्पन्न करतो. अर्थातच सोरायसिस सारख्या जीवनशैलीविकारांमध्ये आयुष्यभर औषध चालू ठेवणे आवश्यक असते. आयुष्यभर औषधे चालू ठेवावी लागतील असे एक तास बऱ्याचदा रुग्ण प्रतिप्रश्न करतात, की जर सोरायसिस ठीकच होणार नाहीये तर औषधी का घ्यावी? आणि जर आयुर्वेद ही याला ठीक करू शकत नाही तर आयुर्वेदाची एवढी कडू औषधी का खावी? यापेक्षा तर ऍलोपॅथी औषधी चांगली आहे गोळी गिळा आणि वरून पाणी प्या.
व्यावहारिक दृष्ट्या रुग्ण जो विचार करत आहे तो काही चूक नाही. सत्य हे आहे ऍलोपॅथी औषधी सोरायसिस नियंत्रित देखील करू शकत नाही. ऍलोपॅथी घेत असताना येणारे साईड इफेक्ट्स ते वेगळे. आयुर्वेदाची औषधी ही रुग्ण जर वैद्यांना न विचारता, तपासून न घेता , स्वतः स्वतःच्या मनाने घेत असेल तर आयुर्वेदाचेही साईड इफेक्ट जाणवू शकतात. ऍलोपॅथीला साइड इफेक्ट्स आहेत हे जाणूनही जर ऍलोपॅथी औषधे रुग्ण घेत असल्यास त्याला याचे दुष्परिणाम अधिक प्रमाणात दिसून येतात. फलस्वरूप हा व्याधी उलट वाढत जातो काही वर्षांनंतर सोरायसिस असलेल्या रुग्णांना संधिवात हे लक्षण उत्पन्न होते . यालाच आधुनिक विज्ञान सोरायटिक ऑर्थोपॅथी असे म्हणतात. सोरायसिस मध्ये संधिवात हे लक्षण कधी कधी इतके उग्र असते की रुग्ण अक्षरशः पंगू होऊन जातो. त्याला उठणे ,बसणे ,चालणे ,फिरणे मुश्किल होऊन जाते. सतत वाढणारी यूरिक ॲसिड लेव्हल संधिवाताला अजूनच येऊन उग्र बनवते. त्वचेची विकृती दिवसेंदिवस वाढत जाते आणि शेवटी त्वचा ही गेंड्याच्या कातडी सारखी जाड आणि काळी होऊन जाते.
आयुर्वेदिक चिकित्सा भले स्वादाने अप्रिय असेल, दीर्घकाळ चालणारी असेल, घेण्यासाठी सुविधा जनक नसेल परंतु तरीही सोरायसिसला नियंत्रणात ठेवते. पुढेच नाही तर काही वर्षानंतर सोरायसिस मुळे उत्पन्न होणारे जे उपद्रव असतात त्यांना वाव देत नाही. नियमित चिकित्सा आणि शंभर टक्के पथ्यपालन तसेच पंचकर्म या सर्वांचे अनुसरण केल्यास आयुर्वेदिक चिकित्सा रोगी व्यक्तीला रिमीशन पिरेड मध्ये प्रवेशित करते. या काळामध्ये रुग्णाला सोरायसिस सुद्धा नाही आणि इतर व्याधी देखील नाही असा आभास होतो. या आभासमध्ये रुग्ण बऱ्याचदा ठीक झालेला ही असतो. यादी उत्पत्ती मध्ये बऱ्याचदा मानसिक भावनांची भूमिका असते. भावना अस्थिर असताना , कितीही पंचकर्म करा, कितीही आयुर्वेद औषधी घ्या रुग्ण बरा होत नाही. रुग्णविचलित झाल्यास नवीन चकते उत्पन्न होतात. याच करिता रुग्णाची चिकित्सा करत असताना त्याच्या मानसिक स्वास्थ्याची देखील काळजी वैद्याला घ्यावी लागते. या सर्व कारणांनी सोरायसिस हा एक याप्य व्याधी बनवून जातो. याचाच अर्थ असा की सोरायसिस सोबत कसे जगावे ही कला शिकून घ्यावी लागते. जीवनाचा एक अंग त्याला समजून चिकित्सा चालू ठेवून त्याचा प्रतिकारही करावा लागतो..
त्वचा रोग आणि आयुर्वेद या संदर्भातील लेखात क्रमशः हा पहिला लेख... पुढील लेख काही दिवस नंतर नक्की लिहिण्यात येईल .
डॉ सुशांत शशिकांत पाटील आयुर्वेदाचार्य :BAMS DYA सर्वद आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय,विद्या नगर, नवीन नगर पालिका जवळ, भुसावळ रोड,फैजपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत