इगतपुरी आग प्रकरण : मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत, घटनेची उच्चस्तरीय चौकशी; मुख्यमंत्र्यांची माहिती लेवाजगत न्यूज नाशिक-
इगतपुरी आग प्रकरण : मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत, घटनेची उच्चस्तरीय चौकशी; मुख्यमंत्र्यांची माहिती
लेवाजगत न्यूज नाशिक- जिल्ह्यात असलेल्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. या आगीत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेत विचारपूस केली आहे.
तसेच, एकनाथ शिंदेंनी दुर्घनास्थळाची पाहणी केली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, “या दुर्घटनेत १७ लोकं जखमी झाले आहेत. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींची सुयश रुग्णालयात भेट घेतली आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.”
“दुर्घटना मोठी असून, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत