कुटुंबाच्या इच्छे विरुद्ध लग्न करणाऱ्या बहिणीच्या नवऱ्यावर तरुणाचा गोळीबार
कुटुंबाच्या इच्छे विरुद्ध लग्न करणाऱ्या बहिणीच्या नवऱ्यावर तरुणाचा गोळीबार
लेवाजगत न्यूज शिर्डी-कुटुंबाच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न करणाऱ्या बहिणीच्या नवऱ्यावर यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या तरुणाने पदयात्रेने येणाऱ्या साई पालखी सोहळ्यात दोन गोळ्या झाडल्या. यात बहिणीचा नवरा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला अन्य पदयात्रींनी पकडून चोप दिल्याने तोही गंभीर जखमी झाला.
व्हिडीओ बघा -महान साधू संतांचे आशीर्वाद हजारो भाविकांना दुसऱ्या दिवशी समरसता महा कुंभात लाभले-भाग १
या घटनेबाबत शिर्डीचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील विकी भांगे याच्या बहिणीने दोन वर्षांपूर्वी नीलेश पवार या तरुणाबरोबर कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले होते. मुंबईत वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या नीलेशचा सुखी संसार सुरू होता. मात्र कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध झालेल्या या लग्नामुळे विकी भांगे याच्या मनात नीलेश पवार याच्याविषयी राग होता. तो नीलेशला संपवण्यासाठी संधी शोधतच होता.
हे बघा - हिंदू धर्मावर प्रहार करणाऱ्यांशी एकत्रित लढा देण्याची गरज समरसता महा कुंभात साधू संतांचे विचार
मुंबईतील गोरेगावची द्वारकाधीश ही साईंची पायी पालखी १० ते १५ दिवसांपूर्वी शिर्डीला निघाली. मुंबईतून नीलेश पवार व त्याची पत्नी यातून पायी शिर्डीला निघाले. याबाबतची माहिती पुसद येथील विकी भांगेला समजताच त्याने मेहुण्याचा पदयात्रेतच काटा काढण्याचा निर्णय घेतला. तो मुंबईपासूनच या पालखीच्या पाळतीवर होता. शुक्रवारी दुपारी ही पालखी शिर्डीजवळील सावळीविहीर येथे नाश्ता करण्यासाठी थांबलेली असताना विकीने गावठी कट्ट्यातून नीलेश पवार याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या नीलेशच्या खांद्याला लागल्या. यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना विकीला पालखीतील इतर पदयात्रींनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत