विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच माता पित्याचा आदर करावा - जीवन महाजन
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच माता पित्याचा आदर करावा - जीवन महाजन
लेवाजगत आमोदे तालुका यावल - येथील घनश्याम काशीराम विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आज दिनांक २२-१२-२०२२ रोजी मराठी भाषा अभ्यास मंडळ बालभारतीचे सदस्य
डॉ. जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी सेंट अलॉयसिस स्कूल भुसावळचे शिक्षक, नवोदित कवी तथा व्याख्याते जीवन पांडुरंग महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कवी जीवन महाजन यांनी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमा सोबत नैतिक मूल्य जपली पाहिजेत तसेच आपल्या मातापित्यांचा, गुरुजनांचा आदर केला पाहिजे हे सांगतानाच स्वलिखित 'बाप' कवितेचे सुंदर गायन करून मुलांना भावनिक साद घालून बसल्या जागेवरच मुलांना प्रत्येकाचाच बाप आठवायला भाग पाडले. यावेळी विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.
याप्रसंगी इयत्ता दहावीतील प्रथम आलेली विद्यार्थिनी तेजल कैलास पाटील, द्वितीय योगिता युवराज सरोदे व विद्यालयातील अन्य गुणवंत विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, जीवन महाजन सर व संस्थाचालकांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
विद्यालयात ठेवीदार दात्यांनी ठेवलेल्या ₹. ४१९४४८ ठेवीवरील व्याज ₹ २३४८४ आज बक्षीस रूपाने दिले जात असून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रयत्नशील राहून बक्षीस पटकावण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष उमेश प्रभाकर पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले. तर
प्रमुख अतिथींचा परिचय संस्थेचे चिटणीस प्रा.उमाकांत पाटील यांनी करून दिला तर मुख्याध्यापक एस. बी. बोठे यांनी नवीन घोषित होऊ घातलेल्या ठेवींची उद्घोषणा केली .
विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे पटवून देताना मुलांनी पाठ्यपुस्तकाची सुरुवातीची पाने वाचणे व ते समजून घेणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या अध्यक्षिय भाषणातून डॉ.जगदीश पाटील यांनी सांगत असताना मुले भारावून गेली होती. संधीचे सोनं कसं करावं हे त्यांनी स्वानुभव सांगत मुलांना उत्तमरीत्या पटवून दिले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थाअध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष विनायक पाटील,चिटणीस प्रा. उमाकांत पाटील,घ.का विद्यालय आमोदे चेअरमन ललित महाजन, खाजगी प्राथमिक शाळा चेअरमन धनराज दादा चौधरी, सदस्य प्रमोद वाघुळदे, एकनाथ लोखंडे,वैभव चौधरी, प्रवीण महाजन सर, खाजगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पाटील, माजी मुख्याध्यापक तसेच ठेवीदार असलेले के. एच. पाटील सर, पी.पी जाधव सर , पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर चौधरी सर यांनी केले. बक्षीस वाचन जे. व्ही. वानखेडे सर यांनी तर आभार श्री पी. एस. पाटील सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत