चिमुकल्यानं खेळता खेळता रिमोटचा सेल गिळला
चिमुकल्यानं खेळता खेळता रिमोटचा सेल गिळला
लेवाजगत न्युज थिरुअनंतपुरम:-केरळची राजधानी थिरुअनंतपुरम शहराच्या वेशीवर असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी २ वर्षांच्या मुलाच्या पोटातून टीव्ही रिमोटचा सेल काढला. चिमुकल्यानं चुकून सेल गिळला होता. एंडोस्कोपीच्या माध्यमातून चिमुरड्याच्या पोटातून सेल काढण्यात आला. डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक उपचार करत मुलाचा जीव वाचवला.
ऋषिकेश असं चिमुकल्याचं नाव आहे. त्यानं चुकून टीव्हीच्या रिमोटमधील सेल गिळला. याबद्दल समजताच ऋषिकेशचे आई वडील त्याला घेऊन जवळच असलेल्या रुग्णालयात गेले. तिथल्या डॉक्टरांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि ऑपरेशन थिएटर सज्ज करण्याच्या सूचना दिल्या. ऋषिकेशला ऍनेस्थेशिया देण्यात आला.
डॉक्टरांनी ऋषिकेशवर शस्त्रक्रिया केली. जवळपास २० मिनिटं शस्त्रक्रिया चालली. त्याच्या पोटातून सेल काढण्यात आला. शस्त्रक्रिया करण्यास आणखी थोडा वेळ लागला असता तर ऋषिकेशच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. चिमुकल्याची प्रकृती आता ठीक आहे. रिमोटमध्ये वापरण्यात येणारा सेल पाच सेंटिमीटर लांब आणि दीड सेंटिमीटर रुंद होता. खेळता खेळता त्यानं चुकून हा सेल पोटात टाकला आणि गिळला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत