ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्नेहसंमेलन रोझोदा येथे संपन्न
ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्नेहसंमेलन
रोझोदा येथे संपन्न
लेवाजगत न्युज खिरोदा:-
खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात १९७१ साली इयत्ता ११ वी च्या वर्गात असलेल्या तरुण ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांचे पन्नास वर्षानंतर आगळेवेगळे स्नेहसंमेलन रोझोदा येथे नुकतेच संपन्न झाले.
खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात १९७१ मध्ये अकराच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या व ज्येष्ठ नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकतचे २५ डिसेंबर रोजी रोझोदा येथे आनंदपूर्ण वातावरणात स्नेहसंमेलन पार पडले.यात नाशिक येथे वैद्यकीय व्यवसायात असलेले डॉ. प्रमोद चौधरी यांनी नरेश बोंडे व पुण्याचे किशोर चौधरी व जळगावचे प्रा.धनंजय कोल्हे यांच्याकडे जुन्या वर्ग मित्रांना एकत्र करून एखादा कार्यक्रम घ्यावा अशी कल्पना मांडली.त्यानुसार व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला.
ग्रुपच्या मोबाईलवर ऑनलाईन तीन चार मिटींग घेऊन २५ डिसेंबर रोझोदा येथे स्नेहसंमेलन घ्यायचे निश्चित झाले.नरेश बोंडे[रोझोदा] ,लीलाधर धांडे [पनवेल],राजाराम पाटील [मुंबई],सुधाकर चौधरी, रमेश लोहार [नाशिक],सदू कोळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले, प्रा.धनंजय कोल्हे यांनी स्मृतिचिन्ह तयार करण्याची व स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची रूपरेखा, स्टेजवरील बॅनर प्रत्येक विद्यार्थ्याचे नावानिशी बॅच तयार करण्याची व स्टेजवरील सजावटीची जबाबदारी घेतली,
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेले ४० ज्येष्ठ तरुण विद्यार्थी आपल्या सहचारीणीसह स्नेहसंमेलनाला हजर होते.
सकाळची गुलाब थंडी, नैसर्गिक आल्हाददायक वतावरणात स्नेहभोजन करुन कार्यक्रमाला सुरवात झाली,लता धनंजय कोल्हे.नीता नरेश बोंडे यांनी सर्व महिलांचे हळद कुंकूवाने स्वागत केले.कार्यक्रमाच्या सुरवातीला हयात नसलेले शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.डॉ. प्रमोद महाजन यांनी प्रस्तावना केली..
या कार्यक्रमास त्या वेळेस विद्यालयात पर्यवेक्षक असलेले शिक्षक पी.डी.महाजन,आर.बी.धांडे,व्ही.आर.पिंपळे, कलाशिक्षक बी.जी.महाजन आणि या कार्यक्रमाला सहकार्य करणारे रोझोदा येथील सुधाकर महाजन यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांसह सापत्नीक शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ तसेच प्रा.धनंजय कोल्हे यांनी लिहिलेल्या आसावरी या कादंबरीची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शनपर भाषणात सर्व शिक्षकांनी ५० वर्षानंतरच्या जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून शालेय जीवनातील गत स्मृर्तींना उजाळा दिला,प्रा.धनंजय कोल्हे यांनी सुत्रसंचलन तर लीलाधर धांडे यांनी आभार व्यक्त केले.पुढील स्नेहसंमेलनाचे आयोजन सुधाकर चौधरी यांनी नाशीक येथे करण्याचे ठरवून सर्वांनी त्यास उपस्थित रहावे असे आवाहन केले,पुढील वर्षी असेच एकत्र येऊन स्नेहसंमेलन करूया! असे ठरवून या आगळ्या वेगळ्या तरुण जेष्ठ नागरिकांचे आनंददायी स्नेहसंमेलन संपन्न झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत