Header Ads

Header ADS

नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी मंदिर चोवीस तास खुले

 

Saptshringi-temple-open-round-the-clock-to-welcome-new-year

नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी मंदिर चोवीस तास खुले 

लेवाजगत न्यूज सप्तशृंगी गड -लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील सप्तशृंगी माता मंदिर नूतन वर्षानिमित्त शनिवारी (दि. ३१) भक्तांच्या दर्शन सुविधेसाठी २४ तास खुले राहणार आहे. सालाबादाप्रमाणे नव्या वर्षाची सुरुवात अनेक भाविक श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे श्री भगवतीच्या दर्शनाने करतात. त्यामुळे सप्तशृंग गडावर भाविकांची गर्दी हाेते. यावर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविकांची गर्दी विभागली जावी. हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वस्त संस्थेच्या वतीने देण्यात आली. नववर्षाच्या स्वागतासाठी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याची प्रथा वाढत असताना भाविक हिंदू संस्कृतीप्रमाणे देवीचे दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करतात. संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि भाविकांच्या अपेक्षापूर्तीसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मंदिर २४ तास खुले राहणार आहे. सर्व नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त ॲड. दीपक पाटोदकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.