Header Ads

Header ADS

साधू संतांची विलोभनीय शोभायात्रा-समरसता महाकुंभ पिंपरुड फाटा ते वढोदे भव्य शोभा यात्रा दुपारी १ वाजता येण्या-जाण्यासाठी एकेरी मार्ग आजपासून समरसता महाकुंभ; साधू-संत दाखल

 

समरसता महाकुंभ पिंपरुड फाटा ते वढोदे भव्य शोभा यात्रा दुपारी १ वाजता   येण्या-जाण्यासाठी एकेरी मार्ग  आजपासून समरसता महाकुंभ; साधू-संत दाखल

समरसता महाकुंभ पिंपरुड फाटा ते वढोदे भव्य शोभा यात्रा दुपारी १ वाजता

 येण्या-जाण्यासाठी एकेरी मार्ग

आजपासून समरसता महाकुंभ; साधू-संत दाखल

 लेवाजगत न्यूज निष्कलंक धाम (वढोदा ता. यावल) -येथे आयोजित समरसता महाकुंभाला २९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी ६० हजार स्क्वेअर फूट जागेत भव्य वॉटरप्रूफ सभा मंडपाची उभारणी करण्यात आला आहे. तेथे एकाचवेळी ३५ हजार भाविक बसू शकतील. शिवाय गर्दीमुळे कोंडी टाळण्यासाठी फैजपूर, सावदा, भुसावळहून पिंपरूड ते वढोदे या ठिकाणी जाण्यासाठी एकेरी मार्ग असेल तर परत येण्यासाठी वढोदा, विरोदा,पिंपरुड फाटा, विरोदा आमोदा असा मार्ग राहील.

हा व्हिडीओ बघा -समरसता महाकुंभाच्या पूर्वसंध्येला निष्कलंक धाम वाढोडे येथे करण्यात आलेली रोषणाई,संत चर्चा व भव्य दिव्य अशा सभा मंडपाचे दृश्य फक्त- लेवाजगत न्यूज बघा

https://youtu.be/iH_GFhG9ubM


महाकुंभला गुरुवारी दुपारी १ वाजता शोभायात्रेने सुरुवात होईल. या महाकुंभात येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी ६० हजार स्क्वेअर फूट जागेत मंडप आहे. तेथे एकाचवेळी ३० ते ३५ हजार भाविक बसू शकतील. सभा मंडपाच्या बाहेर एक लाख स्क्वेअर फूट मोकळी जागा आहे. तसेच संतमहंतांसाठी ४ हजार स्क्वेअर फुटामध्ये ५० बाय ८० आकाराचे व्यासपीठ असेल. तेथे २०० संतमहंत बसतील. भोजनासाठी ६० हजार स्क्वेअर फुटामध्ये मंडप टाकण्यात आला आहे.

    एकाचवेळी ६ हजार भाविकांना तेथे भोजन करता येईल. निवासासाठी २५ हजार स्क्वेअर फूट जागेत भव्य मंडप टाकून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

     सलग तीन दिवस रक्तदान

 महाकुंभ काळात सलग तीन दिवस रक्तदान शिबिर घेण्यात येईल. शिवाय अग्निशमन, आरोग्य विभाग, पोलिस विभाग, कार्यालय, धार्मिक साहित्य असे विविध ४० स्टॉल्स असतील. 

फैजपूर व सावदा येथून कार्यक्रमस्थळी ये-जा करण्यासाठी महामंडळाच्या बसेस असतील.

       असे आहेत मार्ग : 

फैजपूर, सावदा, भुसावळहून पिंपरूड ते वढोदे या ठिकाणी जाण्यासाठी एकेरी मार्ग सुरू केला आहे. परतिचा मार्ग वढोदे, विरोदा, पिंपरुड फाटा, विरोदा आमोदा असा मार्ग राहील. 

     डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर यांच्यासह ८६ कर्मचारी, २५ होमगार्ड, डी. एन. कॉलेजचे एनसीसी बंदोबस्त सांभाळतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.