Header Ads

Header ADS

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ख्रिश्चनांना आकर्षित करण्यासाठी प्रथमच ख्रिसमस डिनरचे आयोजन

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ख्रिश्चनांना आकर्षित करण्यासाठी प्रथमच ख्रिसमस डिनरचे आयोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ख्रिश्चनांना आकर्षित करण्यासाठी प्रथमच ख्रिसमस डिनरचे आयोजन 

वृत्तसंस्था नवी दिल्ली -देशातील ख्रिश्चन समाजाला आपलेसे करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार प्रयत्न करत आहे. आता प्रथमच केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला शुक्रवारी मेघालय हाऊसमध्ये ख्रिसमस डिनरचे आयोजन करणार आहेत. संघाशी संलग्न राष्ट्रीय ख्रिश्चन फोरमच्या या कार्यक्रमात जम्मू-काश्मीर ते केरळपर्यंतचे चर्च प्रमुख सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेशकुमारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

     उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील चर्च प्रमुखांनाही राष्ट्रीय ख्रिश्चन मंचातर्फे निमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे, जिथे पाद्री, चर्च आणि काही ख्रिश्चन संस्थांवर हल्ले झाल्याच्या घटना काही काळापासून समोर आल्या आहेत. चर्च आणि चर्चच्या प्रमुखांनीही राजकीयदृष्ट्या तटस्थ राहिले पाहिजे, असे भाजप नेत्यांचे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्यांदा विजयानंतर संघ किंवा भाजपशी अंतर ठेवणे योग्य नाही, असे ख्रिश्चन समुदायाचेही मत आहे. मतपेढीच्या राजकारणाचा भाग बनू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराने चर्च प्रमुखांना सांगितले आहे.

     उत्तरपूर्व ... ३ राज्यांतील ७० टक्के ख्रिश्चन मतदारांना जाेडण्याचा प्रयत्न : ईशान्येतील मेघालय, नागालँड आणि मिझोराममध्ये ७०% ख्रिश्चन लोकसंख्या आहे. या राज्यांमध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ईशान्येकडील मंडळींतील भाषणात ख्रिश्चन नेते पोप फ्रान्सिस यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याचा विशेष उल्लेख केला होता.

     काश्मीर...ख्रिस्ती प्रतिनिधींना निमंत्रणाचा माेठा राजकीय डाव

जम्मू-काश्मिरातून ख्रिश्चन प्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. तेथील मुस्लिमबहुल लोकसंख्या पाहता हा संघाची ही मोठी खेळी मानली जाते. २०११ च्या जनगणनेनुसार, तेथे १.२५ कोटी लोकसंख्येमध्ये सुमारे

३६ हजार ख्रिश्चन आहेत.

     केरळ... १८% ख्रिश्चन मतदार भाजपसाठी ठरतील गेम चेंजर

केरळात ३५ दशलक्ष लोकसंख्येपैकी सुमारे १८% ख्रिश्चन मतदार आहेत. येथे भाजपचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न आहे. २०२१ विधानसभा निवडणुकीत भाजपला ११.३% मते मिळाली होती. २०१६ मध्ये १०.५३ टक्के मते मिळाली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.