Header Ads

Header ADS

नववर्षाची सुरुवात सुटीने ११ वेळा येणार सलग चार दिवसाचा हॉलिडे

 

New Year's-beginning-with-holiday- 11-times-coming-four-day-holiday-in-a-row

नववर्षाची सुरुवात सुटीने ११ वेळा येणार सलग चार दिवसाचा हॉलिडे 

लेवाजगत न्यूज सावदा -नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आता केवळ सात दिवस शिल्लक राहिले आहेत. २०२३चे कॅलेंडर बाजारात दाखल झाले असून, त्या निमित्ताने नव्या वर्षातील सुट्यांचे नियोजन व चर्चा सुरू झाली आहे. यात सरकारीच नाही तर खासगी कंपनीतील कामगारही मागे नाहीत. २०२३मध्ये सलग चार दिवस सुट्यांचे ११, तर पाच दिवस सुट्यांचे तीन तर सहा दिवस सुट्यांचा योग एकदा आहे.

     थर्टीफर्स्ट शनिवारी असल्याने नवीन वर्षाच्या सप्ताहालाही रविवार या पहिल्या वारपासूनच सुरुवात होत आहे. नवीन वर्षात वीकेंड आणि वीकेंडला जोडून किंवा एक दिवसाआड येणाऱ्या सुट्यांची संख्या पन्नासहून अधिक आहे. डिसेंबर अखेरच्या आठवड्यातील शुक्रवारी सुटी घेतल्यास शनिवार व रविवारी वीकेंडची सुटी असेल. २६ ते २९ जानेवारीच्या दरम्यान २७ तारखेला सुटी टाकल्यास चार दिवस सुटी आहे. ८ ते १२ मार्चदरम्यान तीन दिवस सुट्यांचे आहेत.

     उर्वरित दोन दिवस रजा टाकल्यास पाच दिवसांची दीर्घ सुटी मिळू शकते. एप्रिल महिन्यात ४ ते ९ या कावधीत चार दिवस सुटी असून येथेही दोन दिवस रजा घेतल्यास पूर्ण सहा दिवस सुटी मिळेल. १७ ते २० जूनदरम्यान १९ तारखेला रजा घेतल्यास चार दिवस सुटी मिळेल. १२ ते १६ ऑगस्ट या कावधीत १४ तारखेला रजा मिळाल्यास पाच दिवसांची दीर्घ सुटी मिळेल. अशीच संधी २६ ते ३० ऑगस्ट या कालावधीतही आहे. पुढे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातही प्रत्येकी एक रजा घेतल्यास चार दिवस सुट्यांचा याेग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.