नाशिक येथून औरंगाबाद जाणारी धावती लालपरी पेटली प्रवाशी सुरक्षित
नाशिक येथून औरंगाबाद जाणारी धावती लालपरी पेटली प्रवाशी सुरक्षित
लेवाजगत न्यूज नाशिक -येथून औरंगाबादच्या दिशेने निघालेल्या एसटी महामंडळाच्या सिल्लोड आगाराच्या धावत्या बसने पेट घेतल्याची घटना गुरुवारी येथील नाशिक मार्गावर घडली. चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने पाणी टाकून आग शमवल्याने पुढील अनर्थ टळला.
येथील जनता महाविद्यालयासमोर बस आल्यानंतर रेडिएटरमधून अचानक धूर निघायला लागला. धुराचे प्रमाण वाढल्याने चालक रघुनाथ बावसकर यांना काहीतरी बिघाड झाल्याचे तत्काळ लक्षात आले. त्यांनी तातडीने एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी करत सर्व ५४ प्रवाशांना खाली उतरवले. शेजारील घरातून पाणी आणून पाणी ओतल्याने आग विझली व पुढील अनर्थ टळला. वाहक विष्णू दांडगे यांनी तात्काळ येवला डेपोशी संपर्क साधून या प्रवाशांसाठी बसची व्यवस्था केली. समयसूचकतेबद्दल चालक व वाहकाचे प्रवाशांनी आभार मानले. दरम्यान, बसला आग का लागत आहेत, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत