नरेंद्र नारखेडे वारकरी भूषण तर तुकाराम सुरंगे यंदाचे वारकरी रत्न चे मानकरी
नरेंद्र नारखेडे वारकरी भूषण तर तुकाराम सुरंगे यंदाचे वारकरी रत्न चे मानकरी
लेवाजगत न्यूज सावदा -संत मुक्ताई संस्थानतर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा ‘मुक्ताई वारकरी भूषण’ पुरस्कार फैजपूर येथील नरेंद्र नारखेडे, तर ‘वारकरी रत्न’ पुरस्कार निमखेड (ता.बोदवड) येथील तुकाराम महाराज सुरंगे यांना जाहीर झाला आहे. १ जानेवारी रोजी वितरण होईल. वारकरी संप्रदायातून संत साहित्य, दिंडी परंपरेची जोपासना करणाऱ्यास दरवर्षी मुक्ताई वारकरी भूषण व मुक्ताई वारकरी रत्न पुरस्कार देण्यात येतो.
मानचिन्ह, पंचवस्त्र, शाल श्रीफळ व ११ हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूर, सदस्य रवींद्र पाटील, रवींद्र महाराज हरणे आहेत. दोन्ही पुरस्कार १ जानेवारीला दुपारी १ वाजता जुने मुक्ताई मंदिर येथे चैतन्य महाराज देगलुरकर, गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूर यांचे हस्ते देण्यात येतील. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांची उपस्थिती राहील, अशी माहिती व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत