केळीच्या खोडापासून बनवलेली समईचे आकर्षण ठरली समरसता महाकुंभात विवरे येथील कला शिक्षक साळुंके यांची संकल्पना
केळीच्या खोडापासून बनवलेली समईचे आकर्षण ठरली समरसता महाकुंभात
विवरे येथील कला शिक्षक साळुंके यांची संकल्पना
लेवाजगत न्यूज सावदा: - समरसता महाकुंभात शेकडो साधू संत यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले ती समई केळीच्या खोडापासून बनवलेली होती.या वेळी हजरो भाविक उपस्थित होते त्यांना हि समईचे आकर्षण वाटले.
वढोदे फैजपूर (Faizpur) येथे सुरू असलेल्या समरसता महाकुंभात (Samarasata Mahakumbha) देशभरातून. साधू ,संत, महात्म्य येत आहे. अशा अद्वितीय कार्यक्रमात केळीच्या (banana) खोडापासून समई तयार करण्याची कलाकुसरी विवरा तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील कला शिक्षक अर्जुन साळुंके यांनी केली आहे.त्यांच्या या संकल्पेनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.(lewajagat news)
दि.२९ रोजी समरसता महाकुंभाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमात प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे.यावेळी श्री साळुंके यांनी बनवलेल्या समईचे उपस्थिती संतांना व भाविकांना आकर्षण वाटले.
वढोदे येथील समरसता महाकुंभात कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन उपस्थिती संतांनी केले,या समईचे वैशिष्ट्य आहे, केळीच्या खांबापासून तयार केलेली ही समई अतिशय कलाकुसरीने विवरा येथील ग.गो.बेंडाळे हायस्कूल चे कला शिक्षक अर्जुन साळुंके यांनी केली आहे.यासाठी टाकाऊ असलेल्या केळीच्या खोडापासून व केळीच्या फुलापासून आकर्षक अशी समई लक्षवेधक ठरत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत