मुंबई नागपूर सारखे जळगावात भूखंड लाटणारांचे रॅकेट-आ. सुरेश भोळे यांची लक्षवेधी
मुंबई नागपूर सारखे जळगावात भूखंड लाटणारांचे रॅकेट-आ. सुरेश भोळे यांची लक्षवेधी
लेवाजगत न्यूज जळगाव -नागपूरच्या भूखंडाच्या प्रकरणावरून विराेधकांनी सरकारला घेरले असताना शुक्रवारी आमदार सुरेश भाेळे यांनी हिवाळी अधिवेशनात जळगावात देखील भूखंडांचे श्रीखंड लाटणाऱ्यांचे रॅकेट असल्याचा गाैप्यस्फाेट केला. या रॅकेटच्या चाैकशीची मागणी त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली. शासनातर्फे मंत्री उदय सामंत यांनी चाैकशीचे आश्वासन दिले. जळगावात मनपाने आरक्षण टाकलेल्या जागा या काही व्यावसायीकांच्या साेईने खरेदी करणे, आरक्षण मुक्त करण्याचे प्रकार पुढे आले आहे. मनपाकडे रस्त्यांसाठी ५ लाख नसल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे भूखंडासाठी काेट्यावधी रूपये बिल्डरांच्या घशात घातले जातात. शहरात रॅकेट सक्रीय असल्याची बाब भाेळे यांनी सभागृहात मांडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत