Header Ads

Header ADS

माझ्या दिव्याला शोधा हो! २ वर्षांच्या लेकीला घेऊन पोलिसांसमोर रडायचा; ७ महिन्यांनी गूढ उककलं


 माझ्या दिव्याला शोधा हो! २ वर्षांच्या लेकीला घेऊन पोलिसांसमोर रडायचा; ७ महिन्यांनी गूढ उककलं

लेवाजगत न्युज गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील वसुंधरा येथे गॅरेज चालवणाऱ्या रमणनं त्याच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. रमणनं त्याची प्रेयसी दिव्याला कुल्लूला नेऊन संपवलं. कारमध्ये गळा आवळून रमणनं दिव्याचा खून केला आणि तिचा मृतदेह डोंगरावरून खाली फेकला. पोलीस आणि दिव्याच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी रमणनं इंदिरापुरम पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. आपण दिव्याचा शोध घेत आहोत, असं रमण भासवत होता. जवळपास ७ महिने त्यानं नाटक केलं. पोलिसांसमोर रमण अश्रू ढाळत होता. दोन वर्षांच्या मुलीला घेऊन तो पोलीस ठाण्यात जायचा. मुलगी आईविना राहू शकत नाही. काहीतरी करा, असं म्हणत रमणनं पोलिसांसमोर उत्तम अभियनय केला. पोलिसांनीदेखील त्याच्यावर विश्वास ठेवला.

पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर रमण राम विहार वसाहतीत असलेल्या दिव्याच्या आईच्या घरात पोहोचला. दिव्या बेपत्ता झाली आहे. तिचा फोन बाथरुममध्ये पडून तुटला. तो दुरुस्ती करण्यासाठी दिला आहे, असं रमणनं दिव्याच्या आईला सांगितलं. दिव्या आणि रमण यांच्यात सर्वकाही आलबेल नव्हतं. त्यामुळे दिव्या नाराज होऊन निघून गेली असावी असा तिच्या आईचा समज झाला. रमणनं दुसऱ्या तरुणीशी संबंध असल्याचं दिव्यानं आईला सांगितलं होतं. त्यामुळे रमणच्या बोलण्यावर आईनं विश्वास ठेवला.

रमणनं अनेकदा वेगवेगळी माहिती दिली. दिव्या नाराज होऊन गेल्याचं त्यानं काहीवेळा सांगितलं. तर दिव्या का गेली नाही हे आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे पोलिसांना संशय आला. दिव्याच्या फोनचा काय झालं? इतक्या दिवसांमध्ये तो दुरुस्त झाला नाही का? असे प्रश्न दिव्याची आई बिट्टोनं रमणला विचारले. मात्र रमणनं उत्तर दिलं नाही. त्यामुळे बिट्टोला संशय आला. बिट्टो पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी रमणची चौकशी करण्याची मागणी केली.

दिव्याचा फोन कुठे आहे, असा प्रश्न पोलिसांनी विचारला. त्यावर दुरुस्तीला दिला आहे, असं उत्तर रमणनं दिलं. मात्र फोन कुठे दुरुस्तीला दिला आहे या प्रश्नाचं उत्तर त्यानं दिलं नाही. पोलिसांनी फोनचे कॉल तपशील आणि लोकेशन काढलं. शेवटचं लोकेशन कुल्लू होतं. त्यानंतर रमणच्या फोनचं लोकेशन तपासण्यात आलं. १८ मे रोजी दोन्ही फोनचं लोकेशन कुल्लूमध्ये होतं. त्यामुळे संशय वाढला.

१७ मे रोजी फ्लॅटच्या आसपासचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. एका फुटेजमध्ये रमण दिव्यासोबत कारमध्ये बसताना दिसला. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा रमण पोपटासारखा बोलू लागला. त्यानं हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.