Header Ads

Header ADS

दूधसंघाच्या निवडणुकीत पाकिटाच्या हिस्से वाटपावरून भालोद येथे वाद

दूधसंघाच्या निवडणुकीत पाकिटाच्या हिस्से वाटपावरून भालोद येथे वाद


 दूधसंघाच्या निवडणुकीत पाकिटाच्या हिस्से वाटपावरून भालोद येथे वाद 

लेवाजगत न्यूज भालोद -जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून मतदारांपर्यंत पाकीट पोहाेचल्याची चर्चा होती. त्याचे पडसाद तालुक्यातील भालोद या गावात उमटले. दूध संघाकडून मतदानाचा हक्क प्राप्त संचालकांकडे गावातील काही दूध उत्पादक सभासद पोहाेचले. त्यांनी तुम्हाला मिळालेल्या पाकिटातील रकमेतून आमचा हिस्सा द्या, अशी मागणी केली. मात्र, संबंधितांनी मी पक्षाच्या उमेदवाराला प्रामाणिकपणे मतदान केले. पैसे घेण्याचा विषयच नाही, असे सांगितले. यानंतरह हा वाद उफाळून धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला.

     भालोद येथील दूध उत्पादक सहकारी संस्थेने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी दिलीप हरी चौधरी यांच्या नावाने मतदानाचा ठराव केला होता. रविवारी गावात उफाळलेल्या वादात काही लोकांनी सांगितले की, मतदानाचा अधिकार देताना मतदानासाठी जे काही पाकिट येईल त्यातील वाटा दूध उत्पादकांना देण्यात येईल, असे ठरले होते. 

     मात्र मतदान होऊन अनेक दिवस उलटूनही वाटा न मिळाल्याने रविवारी संस्थेचे काही दूध उत्पादक एकत्र आले. त्यांनी गावातील दूध संघासमोरच दिलीप चौधरी यांना जाब विचारला. मात्र, चौधरींनी आपण एक पैसाही न घेता भाजपच्या उमेदवारांना मतदान केल्याचे सांगितले. तथापि इतरांचा यावर विश्वास न बसल्याने शाब्दिक चकमक, हमरीतुमरी आणि धक्काबुक्कीपर्यंत वाद वाढला. लीलाधर चौधरी, गणेश नेहेते, भीमराव भालेराव, नितीन वासुदेव चौधरी, लीलाधर विश्वनाथ चौधरी, संजय ढाके, नितीन लहू चौधरी, भास्कर पिंपळे, नारायण चौधरींनी दूध उत्पादकांची समजूत काढली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.