बैलगाडा शर्यत सहा जणांवर गुन्हा दाखल ३ बैल ३ घोडे जप्त
बैलगाडा शर्यत सहा जणांवर गुन्हा दाखल ३ बैल ३ घोडे जप्त
लेवाजगत न्यूज अजिंठा -गोळेगाव धोत्रा (ता. सिल्लाेड) येथे सार्वजनिक रस्त्यावर घोडे व बैलगाडीची शर्यत खेळणाऱ्या सहा तरुणांविरुद्ध अजिंठा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातून शर्यतीत वापरण्यात येणारे ३ घोडे, ३ बैल, ३ गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
गोळेगाव-धोत्रा मार्गावर काही तरुण घोडा व बैलगाडी शर्यत लावून त्यांना पळवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून अजिंठा ठाण्याचे सपोनि अजित विसपुते, उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विकास चौधरी, संदीप जाधव, रवींद्र बागुलकर आदींनी तपास केला. ही शर्यत १४ डिसेंबर रोजी गोळेगाव येथील इस्माईलखाँ भिकन शहा, अस्लम समद देशमुख, श्रीरंग गव्हाणे, काजिमखाँ अहमदखाँ, तर भोकरदन तालुक्यातील सलमान शहा तर अन्य एक यांनी घेतल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याविरुद्ध परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर घोडे-बैलगाडी शर्यत आयोजित करून प्राण्यांना अमानुषपणे काठीने मारून जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींच्या ताब्यातून ३ घोडे, ३ बैल, ३ गाड्या पोलिसांनी जप्त केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत