आदित्य ठाकरेंच्या नावाने रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप
आदित्य ठाकरेंच्या नावाने रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप
लेवाजगत न्युज मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यार गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 फोन कॉल होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केलाय. लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी हा गंभीर आरोप केलाय. परंतु, शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, असे आव्हान कायंदे यांनी केले आहे.
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यातच आता राहुल शेवाळे यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
"एयूचा विषय खूप गंभीर आहे. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा आहे. बिहार पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांचा तपास वेगवेगळा आहे. त्यामुळे याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे", असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.
"राहुल शेवाळे यांना आदित्य ठाकरेंवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेनं तक्रारी केल्या आहेत. याची दखल अजून कोणीही घेतली नाही, त्याचं काय झालं? त्या महिलेची तक्रार का घेतली जात नाही? राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, असे मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत