Header Ads

Header ADS

कोविड काळात जादा घेतलेले १२.५कोटी देण्यास कोविड हॉस्पिटलची टाळाटाळ

 

12.5-crore-taken-excess-in-covid-time-to-give-covid-hospital-avoidance

कोविड काळात जादा घेतलेले १२.५ कोटी देण्यास कोविड हॉस्पिटलची टाळाटाळ 

वृत्त संस्था अमरावती -शहरातील सात कोविड हाॅस्पिटल्सने दोन वर्षे उलटली तरी अजूनही कोरोना रुग्णांकडून जिल्हा प्रशासनाद्वारे निश्चित दरापेक्षा जास्ती घेतलेले १.२५ कोटी परत केले नसल्याचे वास्तव आहे. याबाबत जिल्हा प्रशासनही आतापर्यंत निद्रेत होते. त्यांच्याकडून कोणतीही कारवाई किंवा लेख पत्रव्यवहार झाला नसल्याने ही बाब सर्वांच्याच विस्मरणात गेली होती. परंतु, आता पुन्हा कोरोनाच्या नव्या लाटेचे संकट घोंगावत असताना या जास्ती घेतलेल्या रकमेचे काय झाले. ती परत मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला.

     पहिल्या व दुसऱ्या कोविड लाटेत कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने खासगी कोविड हाॅस्पिटल्सला मंजुरी दिली होती. या खासगी हाॅस्पिटल्सने मिळालेल्या संधीचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेत रुग्णांकडून जास्तीचे पैसे उकळल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यानंतर प्रशासनाने मनपा लेखा परिक्षकांचा समावेश असलेल्या समितीकडे शहरातील खासगी कोविड हाॅस्पिटल्सचे ऑडिट करण्याची जबाबदारी सोपवली. सात खासगी कोविड हाॅस्पिटल्सचे ऑडिट केल्यानंतर मनपा मुख्य लेखा परीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या अहवालानुसार २ हजार ६७५ कोरोना रुग्णांकडून १ कोटी ३० लाख ७६ हजार ५९० रु. निश्चित दरापेक्षा जास्त आकारल्याचे उजेडात आले होते. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या हाॅस्पिटल्सला रुग्णांकडून जादा घेतलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले. मात्र, आजवर केवळ ४ लाख ४८ हजार ९०० रु. तीन हाॅस्पिटल्सकडून रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांना परत करण्यात आले आहेत. 

     प्रशासनाने केले होते दर निश्चित

कोविड चाचणी, सीटी स्कॅन, एमआरए तसेच औषधं, इंजेक्शन, एक्स रे, खाटांचे दर जिल्हा प्रशासनाने निश्चित करून दिले होते. परंतु, अनेक रुग्णांनी जिल्हा प्रशासनाकडे जास्ती दर आकारले जात असल्याच्या तक्रारी केल्या. तसेच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयांना अचानक भेटी देत तेथील एकूणच प्रकार बघितला. त्यानंतर रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते.

    हाॅटेल्स, मंगल कार्यालयात रुग्णालये

शहरातील अनेक नामांकित हाॅटेल्सने शासनाच्या आवाहनानुसार शहरातील हॉटेल्स तसेच मंगल कार्यालयात कोविड हाॅस्पिटल्स सुरू केले होते. या हाॅस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी मोठया प्रमाणात रुग्णही दाखल झाले. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना सुटीही देण्यात आली. परंतु, जास्ती आकारलेली रक्कम काही परत देण्यात आली नाही.

    अहवाल कलेक्टरांकडे तत्काळ सादर केला

शहरातील सात कोविड हाॅस्पिटल्सने कोरोना रुग्णांकडून एकूण १ कोटी २५ लाख रुपये जास्तीचे घेतल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. मानवीय दृष्टीकोनातून हाॅस्पीटल्सने तत्काळ रुग्णांना रक्कम परत द्यायला हवी.राम चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक,मनपा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.