Header Ads

Header ADS

यावल तालुक्यातील शेतकऱ्यांची बंद असलेल्या उपसा सिंचन योजना सुरु करण्या साठी मंत्रालयात धाव


यावल तालुक्यातील शेतकऱ्यांची बंद असलेल्या उपसा सिंचन योजना सुरु करण्या साठी मंत्रालयात धाव


यावल तालुक्यातील शेतकऱ्यांची बंद असलेल्या उपसा सिंचन योजना सुरु करण्या साठी मंत्रालयात धाव 

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी आमोदा       -आमोदा, बामणोद, ता.यावल उपसा सिंचन योजनांच्या नूतनीकरण व पुनरुज्जीवन कामास लवकरात लवकर सुरुवात व्हावी .यासाठी थेट मुंबई मंत्रालय गाठून मुख्यमंत्री कार्यालयात आमोदा - बामणोद येथील शेतकऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. यात आमोदा येथील प्रगतिशील शेतकरी  मिठाराम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते  प्रमोद वाघूळदे, माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते चेतन चौधरी, बामनोद  उपसा जलसिंचन चेअरमन दिनकर भंगाळे, पांडू महाजन यांची उपस्थिती होती. 

गेल्या काही वर्षांमध्ये यावल तालुक्यातील भूजलात मोठी घसरण झाल्याने संपूर्ण बागायती क्षेत्र धोक्यात आले आहे. दरम्यान यावल तालुक्यातील  आमोदा, बामणोद या उपसा सिंचन योजना अत्यंत जुन्या झाल्याने जीर्ण अवस्थेत आहेत तर भालोद उपसा सिंचन योजना बंद स्थितीत आहे. या योजना जुन्या व  बंद असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळच्या वेळी पाणी न मिळाल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे ऊस व केळीसारख्या नगदी पिकांचे  लागवडीचे प्रमाण घटून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.सदर योजने मार्फत आमोदा व बामणोद शिवारातील एकूण ५००० एकर जमीन ही या योजनेवर अवलंबून आहे. सदरच्या उपसा सिंचन योजना सुरु करण्यासाठी शेतकर्यांनी तत्कालीन आ. स्व.हरिभाऊ जावळे यांचे कडे निवेदन दिले होते. त्याची दखल घेत स्व.हरिभाऊ जावळे यांनी ना. गिरीशभाऊ महाजन यांचे कडे या योजनांचे  नूतनीकरण व पुनरुज्जीवन करण्यासाठी आग्रहाची विनंती केलेली होती.

त्या अनुषंगाने  ना. गिरीशभाऊ महाजन यांनी सदरील उपसा सिंचन योजना सुरु करण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना प्रस्ताव सादर करण्यास आदेशित केले होते. तापी पाटबंधारे महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार आमोदा उ.सिं. योजनेच्या २७.३९ कोटी, भालोद उ.सिं. योजनेच्या २९.५० व बामणोद उ.सिं. योजनेच्या २१.६३ कोटी रुपयांच्या उपसा सिंचन नूतनीकरण व पुनरुज्जीवन करण्याच्या  अंदाजपत्रकास मंत्रालयात ना.गिरीशभाऊ महाजन यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या  नियामक मंडळाच्या बैठकीत मा.ना.गिरीशभाऊ महाजन यांनी २०१८ मध्ये मान्यता दिली होती. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी आमोदा,

 बामणोद भालोद येथील शेतकरी आग्रही असून मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या सह्यानीशी नुकतेच निवेदन दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.