टोल भरण्यावरून महिलांचा राडा: दोन महिला समोरासमोर भिडल्या; तुंबळ हाणामारीचा VIDEO व्हायरल
टोल भरण्यावरून महिलांचा राडा: दोन महिला समोरासमोर भिडल्या; तुंबळ हाणामारीचा VIDEO व्हायरल
- पोलीस पत्नी आणि महिला टोल कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही महिलांमध्ये टोलनाक्यावर तुंबळ हाणामारीही झाली.
वृत्त संस्था नाशिक : टोलनाक्यावर टोल भरण्यावरून होणारे वाद काही नवीन नाहीत. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरही बुधवारी सायंकाळी टोल भरण्याच्या किरकोळ कारणातून दोन महिला एकमेकांना भिडल्याची घटना घडली आहे. टोलनाक्यावरील महिला कर्मचारी आणि सीआरपीएफ पोलीस पत्नी यांच्यात टोल भरण्यावरून हाणामारीचा प्रकार घडला. पिंपळगाव पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या मध्यस्थी व माफीनाम्यानंतर या वादावर पडदा पडला आहे.
टोल नाक्यावर हाणामारी व्हिडीओ-
मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान आपल्या पत्नी व दोन मुलांसोबत पुणे येथे जात होते. त्यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर आपले शासकीय कार्ड दाखवून खासगी वाहन सोडण्याची विनंती केली. मात्र टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरवाच लागेल, कार्ड चालणार नाही, असं सांगितलं.
समता भातृ मंडळ पिंपरी चिंचवड जाहिरात-
सदर पोलीस कर्मचाऱ्याने पैसे देऊन टोल भरल्यानंतर वाहनात बसलेली पोलीस पत्नी व महिला टोल कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही महिलांमध्ये टोलनाक्यावर तुंबळ हाणामारीही झाली. काही वेळानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर टोल कर्मचारी यांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस प्रशासनाने दोन्ही तक्रारदार यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर वाद मिटवत सबुरीचा सल्ला दिला. माफीनामा लिहून देत वादावर पडदा टाकण्यात आला.
दरम्यान, टोल नाक्यावरील हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिंपळगाव येथील टोल नाका हा कायम वादात असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत