WhatsApp ची धडक कारवाई, २३ लाखांहून जास्त भारतीय अकाउंटवर बंदी घातली, कारणही सांगितले
WhatsApp ची धडक कारवाई, २३ लाखांहून जास्त भारतीय अकाउंटवर बंदी घातली, कारणही सांगितले
लेवाजगत न्युज:- व्हॉट्सॲपने जुलै मध्ये २३ लाखांहून जास्त भारतीय अकाउंट वर बंदी घातली आहे. सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मने गुरुवारी ही माहिती दिली आहे. आपल्या मंथली कंप्लायन्स रिपोर्ट (मासिक अनुपालन रिपोर्ट) मध्ये ही माहिती दिली आहे. WhatsApp ने म्हटले की, जुलै २०२२ दरम्यान २३.८७ लाखांहून जास्त भारतीय अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. यात १४ लाखांहून जास्त अकाउंट वर यूजर्सकडून तक्रार करण्याआधीच त्यांना हटवले गेले आहे.
WhatsApp ने गुरुवारी ही माहिती शेअर केली आहे. ही माहिती सांगताना कंपनीने म्हटले की, जुलै महिन्याची ही आकडेवारी अन्य कोणत्याही महिन्याच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. WhatsApp ने जून २०२२ मध्ये २२ लाखांहून जास्त भारतीय अकाउंटला तक्रारी नंतर बंदी घातली होती. तसेच यातील अनेक अकाउंटने नियमांचे उल्लंघन केले होते. मे महिन्यात कंपनीने १९ लाख, तर एप्रिल महिन्यात १६ लाख आणि मार्च महिन्यात १८.०५ लाख अकाउंटवर बंदी घातली होती.
गेल्या वर्षी लागू करण्याता आलेल्या सूचना प्रौद्योगिक नियमांतर्गत मोठ्या डिजिटल मंच (५० लाखांहून जास्त यूजर्स असलेले) दर महिना अनुपालन रिपोर्ट प्रकाशित करणे, मिळालेल्या तक्रारी आणि करण्यात आलेली कारवाई याचा उल्लेख करणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. WhatsApp ने आपली मासिक अनुपालन रिपोर्ट मध्ये म्हटले की, एक जुलै २०२२ आणि ३१ जुलै २०२२ दरम्यान २३ लाख ८७ हजार अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. यात १४ लाख १६ हजार अकाउंटवर तक्रार करण्याआधीच हे अकाउंट बंद करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत