वाकड येथील लेवा पाटीदार समाज तर्फे रक्तदान शिबीरास प्रतिसाद
वाकड येथील लेवा पाटीदार समाज तर्फे रक्तदान शिबीरास प्रतिसाद
लेवाजगत न्यूज वाकड -येथील लेवा पाटीदार समाज मंडळ च्या वतीने फेवर केअर सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर मध्ये ४२ जणांकडून रक्तदान करण्यात आले. या वेळी २५ समाज बांधवांना फ्लू या तापाची लस देण्यात आली
काही रक्तदाते यांचे हिमोग्लोबीन कमी पडल्याने त्यांना रक्तदानासाठी अपात्र ठराव्यात आले नाही.तर आपल्या पहिल्याच रक्तदान शिबिरामध्ये लेवा पाटीदार समाज, वाकड यांनी अर्ध शतक लगावाले असते.असे मंडळ पदाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
डॉ. पियुष चौधरी यांनी आपल्या क्लिनिक मध्ये जहांगीर हॉस्पिटलशी बोलून फार छान व्यवस्था केल्याबद्दल सर्वांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे.
या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला निखिल चौधरी, आकाश भंगाळे, पराग धांडे, जीवन बोरोले, स्मिता कोल्हे,डॉ. अशोक चौधरी, धनंजय राणे, नीलेश धांडे, चंदन महाजन, गौरव भंगाळे, मुकेश येवले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत