Header Ads

Header ADS

वाचन संस्कृती जपण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तक द्यायला हवे-योगेश जोशी यांचे चिमुकले जगत कविता संग्रह प्रकाशन वेळी कल्याण येथे प्रतिपादन

Vācana-sanskr̥tī-japaṇyāsāṭhī- mulān̄cyā-hātāta-mōbā'īla-aivajī- pustaka dyāyalā havē-yōgēśa-jōśī- yān̄cē-cimukalē-jagata-kavitā- saṅgraha- prakāśana-vēḷī-kalyāṇa- yēthē-pratipādana


वाचन संस्कृती जपण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तक द्यायला हवे-योगेश जोशी यांचे चिमुकले जगत कविता संग्रह प्रकाशन वेळी कल्याण येथे प्रतिपादन

 लेवाजगत न्यूज  सावदा-  "चिमुकले जगत" कवयित्री जया सुधाकर पाटील लिखित, साहित्य संपदा प्रकाशित बालकविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा साई हॉल, वायले नगर, कल्याण(प.) येथे नुकताच पार पडला. पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.राम नेमाडे,जेष्ठ लेखक सुनील जावळे,लेखक व ज्ञानामृत विद्यालयाचे संस्थापक  किसन वराडे, अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष  योगेश जोशी,लेखक व कवी  श्रीकांत पेटकर यांच्या हस्ते पार पडले. कवयित्री जया पाटील यांचे पती  सुधाकर पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलतांना योगेश जोशी म्हणाले, "वाचन संस्कृती जपण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तक वाचायला द्यावे." पुस्तकाविषयी बोलतांना किसन वराडे म्हणाले, "रंगीत चित्रमय पुस्तक लहान मुलांना नक्कीच आकर्षित करेल, मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांना समजून घेणे खूप कठीण असते." ,

      प्रा.डॉ.श्री.राम नेमाडे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुस्तक अतिशय सुंदर असून त्याची बांधणी, कवितांना साजेशी चित्रे उत्तम आहेत. लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल. कवयित्री ने मुलांच्या अंतरंगात डोकावून उत्तम रीतीने त्यांच्या मनातील प्रश्न आणि शंका शब्दात गुंफल्या आहे. आपल्या घरातील स्त्रीचे कलागुण ओळखून तिला घरातील सदस्यांनी पाठिंबा व प्रोत्साहन द्यायला हवे असा संदेश दिला. ",

  आपली मातृभाषा मराठीचे अस्तित्व टिकवण्यासाठी साहित्यिक प्रयत्न करतच आहेत . पालकांनीही साथ देऊन लहान मुलांना इतर भाषांसोबत मराठी वाचनाची सवय लावायला हवी. मोबाईल मुळे पुस्तके वाचण्याचे टाळले जाते." असे जया पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगून बालसाहित्य निर्मिती खुप कमी प्रमाणात होते याची खंत व्यक्त केली. सूत्रसंचालन कुंदा झोपे व वैशाली झोपे यांनी केले. रिया सरोदे व श्रुती झोपे या चिमुकल्यांनी व इतरांनी कवितासंग्रहातील कविता सादर केल्या. कार्यक्रमाला कवयित्री शारदा चौधरी, कवयित्री पुष्पा कोल्हे,कवयित्री अस्मिता सावंत, कवी पराग पाटील आदी उपस्थित होते. जया पाटील ह्यांनी साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी स्वप्नाला मूर्त स्वरूप दिले असे सांगून प्रकाशनसंस्थेचे आभार मानले.सदर प्रसंगी पुस्तकाची रंगीत चित्रमय आकर्षक सजावट करणाऱ्या मनोमय मीडिया आणि पुस्तकासाठी मार्गदर्शक लाभलेल्या सोनाली गुजर आणि भारती मुद्रणालय कोल्हापूर ह्यांचे सुद्धा आभार मानले. मराठी भाषा संवर्धनासाठी आणि पुढील पिढीस भाषेची गोडी वाढविण्यासाठी अशा बालकवितांच्या पुस्तकांनी नक्कीच मदत होईल अशी आशा सर्वत्र व्यक्त होत आहे. जया पाटील ह्या जळगाव जिल्ह्यातील असून यांच्या या कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.