उलवे नोड येथील नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुका दर्शना साठी हजारो भक्तांच्या उपस्थितीत गरजुंना घरघंटी चे वाटप
उलवे नोड येथील नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुका दर्शना साठी हजारो भक्तांच्या उपस्थितीत गरजुंना घरघंटी चे वाटप
लेवाजगत न्यूज सुनिल ठाकूर उरण-जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज, जिल्हा रत्नागिरी तर्फे दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमांतर्गत समाजातील गरिब व गरजू कुटुंबाना रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल कॉम्प्लेक्स उलवे,ता -पनवेल जिल्हा रायगड येथील पादुका व दर्शन सोहळाप्रसंगी घरघंटीचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर,,साई संस्थान वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील ,,जिल्हा परिषद सदस्य उमा मुंढे,महामुंबई चे संपादक मिलिंद खारपाटील, जेष्ठ पत्रकार राकेश खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल कॉम्पलेक्स उलवे येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजतर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. श्रीचे पादुकांचे आगमन नंतर गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन,उपासक दिक्षा दर्शन, पुष्पवृष्टि असे अनेक कार्यक्रम योवेळी संपन्न झाले. भव्य दिव्य असे मिरवणूकही यावेळी काढण्यात आले. श्री पादुकाचे आगमन झाल्यानंतर समाजातील दुर्बल व गरजू व्यक्तींना घरघंटीचे वाटप करण्यात आले.
संस्थेच्या 37 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. दिड लाख जणांना हिंदू धर्मात पुनः प्रवेश देणारे नरेंन्द्राचार्य महाराज यांनी अतिशय मोलाचे काम केले आहे उलवा नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल कॉम्पलेक्स येथेहजारो भाविक भक्तांची येथे उपस्थिती होती.
पादुका दर्शनासाठी पनवेल चे माजी महापौर जे एम म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेलच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत,अरुणशेठ भगत , नगरसेवक ऍड मनोज भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनचे सर्व पदाधिकारी सदस्य,जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडचे सर्व पदाधिकारी सदस्य,स्व स्वरूप संप्रदायचे सर्व पदाधिकारी, शिष्य वर्ग, उपासक यांनी विशेष मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत