Header Ads

Header ADS

दसरा मेळाव्याबाबत अखेर शिवसेनेचं ठरलं !: शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ' प्लॅन बी ' तयार ; टॅक्सीवर उभं राहून करणार भाषण ?

 

दसरा मेळाव्याबाबत अखेर शिवसेनेचं ठरलं !: शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ' प्लॅन बी ' तयार ; टॅक्सीवर उभं राहून करणार भाषण ?

दसरा मेळाव्याबाबत अखेर शिवसेनेचं ठरलं !: शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ' प्लॅन बी ' तयार ; टॅक्सीवर उभं राहून करणार भाषण ? 

वृत्त संस्था मुंबई-शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी कुणाला परवानगी मिळणार हा पेच सध्या कायम आहे. असे असली तरी शिवतीर्थावर मेळावा आम्हीच घेणार यावर मात्र शिवसेना ठाम आहे. बीकेसी एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्याचा शिंदे गटाचा अर्ज मुंबई महानगर पालिकेने स्वीकारला आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळला गेलाय. जर शिवाजी पार्कमध्ये परवानगी मिळाली नाही तर इतर पर्यायांची चाचपणीही शिवसेनेने सुरू केली आहे. शिवसेनेने आपला प्लॉन बी तयारच ठेवलाय.

   ही' युक्ती वापरणार 

   शिवतीर्थावर परवानगी न मिळाल्यास उद्धव ठाकरे नवी युक्ती वापरणार आहे. शिवाजीपार्क समोरील रस्त्यावर उभे राहून किंवा टॅक्सीवर उभे राहून उद्धव ठाकरे भाषण करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या अशा प्रकाराची चर्चा सुरू आहे. पूर्वी बाळासाहेब ठाकरे देखील अशीच युती वापरत होते, तशीच युक्ती उद्धव ठाकरे वापरणार आहे.

    शिवसेनेचा पालिकेकडे अर्ज 

शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून नवे सरकार स्थापन केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळण्याकरता महापालिकेकडे अर्ज केला आहे. तर ठाकरेंचा देखील परवानगी अर्ज पालिकेकडे प्रलंबित आहे. त्यामुळे येत्या दसरा मेळाव्यासाठी कोणाला परवानगी मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

    शिवसेना कोर्टात जाणार

   दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचाच हे गेल्या अनेक वर्षांपासून समीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय. मात्र, यावेळी या जागेवर शिंदे गटाचा मेळावा होणार की, उद्धव ठाकरेंचा याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तर दुसरीकडे शिवाजी पार्कवरच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

    बाळासाहेबांचा मास्टरप्लॉन

    बीकेसी येथील मैदानात मेळावा घेण्यासाठी एमएमआरडीएने शिंदे गटाला परवानगी दिली असली तरी शिवाजी पार्कमध्ये नेमकी कोणाला परवानगी मिळणार, याबाबत मात्र तोडगा निघालेला नाही. अशा वेळी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा मास्टरप्लॉन वापरणार असल्याचे बोलले जाते. पालिकेने परवानगी दिली नाही तर शिवसेना कोर्टात जाणार आहे. वेळ पडल्यास मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची तयारीही शिवसेनेने केली आहे.

  मैदानात घेणार मेळावा

  हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्या दसरा मेळाव्याचे भाषण टॅक्सीवर उभे राहून केले होते. अशा परिस्थितीत जर महापालिकेने शिवसेनेला परवानगी दिली नाही तर उद्धव ठाकरे मैदानात जाऊन मेळावा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा कसा असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

    तरीही मेळावा घ्या

   दरम्यान, परवानगी मिळो अथवा न मिळो, शिवतीर्थावरच सेनेचा दसरा मेळावा घ्या, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊतांच्या जामिनासाठी काल कोर्टात सुनावणी पार पडली. त्यादरम्यान सुनील राऊत आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना राऊतांनी ही माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.